1 / 9हातात बांगड्या घातल्यावर हाताची शोभा वाढते. आजकाल फक्त बांगड्याच नाही तर इतरही अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक प्रकार म्हणजे ब्रेसलेट. हातात छान नाजूक असे ब्रेसलेट घातले की हात छान सुंदर दिसतो. 2 / 9ब्रेसलेटमध्येही विविध प्रकार असतात. त्यापैकी काही प्रकार बाजारात आरामात आणि स्वस्तातही मिळतात. साडी असो वा ड्रेस हे प्रकार छान दिसतात. पाहा कोणते प्रकार आहेत. 3 / 9लहान मुलांना तसेच तरुण मुलींना बेडेड ब्रेसलेट छान दिसते. वेस्टर्न ड्रेसवर हा प्रकार छान दिसतो. रंगीत, समरंगी अशा विविध प्रकारचे मिळतात. 4 / 9चैन ब्रेसलेट्स सगळ्या वयोगटाच्या मुलींना छान दिसतात. मेटलचा वापर करुन हे ब्रेसलेट तयार केले जाते. दिसते मस्त आणि बाजारात आरामात उपलब्ध होते. 5 / 9आणखी एक मस्त आणि लोकप्रिय प्रकार म्हणजे कफ ब्रेसलेट्स. हे ब्रेसलेट पूर्ण गोल नसते. त्याची टोकं जोडलेली नसतात. त्यामुळे ते वापरणे जास्त सोपे जाते. आरामात काढता येते. 6 / 9चार्म ब्रेसलेट्स तरुणपिढीमध्ये प्रसिद्ध आहे. मेटलच्या चेनमध्ये चंद्र-सूर्य किंवा इतरही कोणत्या चिन्हांचे गोल अडकलेले असतात. रोजच्या वापरासाठी हा प्रकार अनेक जण वापरतात. 7 / 9साधे- नाजूक बँगल ब्रेसलेट महिलांच्या हातावर फारच नाजूक आणि छान दिसते. हा प्रकार तसा सगळ्यांच्या ओळखीचा आहे. सगळ्या प्रकारच्या मटेरियलमध्ये हे ब्रेसलेट मिळते. 8 / 9कॉर्ड्स ब्रेसलेट्स सुंदर असे विणलेले असतात. विविध रंगाचे दोरे एकत्र विणून हे ब्रेसलेट तयार केले जाते. कॉटन, नायलॉन किंवा इतरही मटेरियल वापरुन हे ब्रेसलेट तयार करतात. 9 / 9बोलो ब्रेसलेट हा एक फारच सुंदर प्रकार आहे. अगदी नाजूक अशी चेन असते आणि त्याला मस्त असा खडा लावलेला असतो. तुम्हाला जर काही साध वापरायचं असेल तर हा प्रकार नक्की वापरा.