ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

Published:September 30, 2023 10:39 PM2023-09-30T22:39:00+5:302023-09-30T22:53:06+5:30

6 Mistakes You're Making Buying a Bra : स्वतःसाठी कम्फर्टेबल ब्रेसियरची निवड कशी करायची हेच अनेक महिलांना माहिती नसतं, त्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात...

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

ब्रा ही महिलांच्या आयुष्यातील महत्वाची आणि गरजेची वस्तू आहे. ब्रा ही महिलांच्या आयुष्यासाठी जितकी महत्वाची आहे तेवढीच ती तुमचा लूक सुद्धा बदलू शकते. एखाद्या ड्रेसखाली योग्य ब्रा नसेल तर यामुळे तुमचा लूक खराब दिसू शकतो. आपल्यापैकी अनेकींना आपल्या ब्रेसियरचा, ब्रेस्टचा साइज नीट माहित नसतो. तो कसा मोजायचा याबाबतही पुरेशी माहिती नसते. त्यामुळे आपण ब्रेसियरचा रंग, कापड याकडे पाहतो पण त्याचा साइजच व्यवस्थित नसला तर आपल्या स्तनांचा आकार विचित्र दिसतो आणि कालांतराने आपल्याला आरोग्याच्याही काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून ब्रेसीयर विकत घेताना हमखास होणाऱ्या ६ चुका टाळा(6 Bra Sizing Mistakes Almost Everyone Makes).

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

ब्रेसीयर खरेदी करताना सर्वप्रथम त्याचे फिटिंग हे योग्य असले पाहिजे. योग्य फिटिंगची ब्रेसीयर घेतल्यास ती आपल्या स्तनांना योग्य पद्धतीने आधार देते. ब्रेसीयर विकत घेताना त्याच्या स्ट्रेप्स, कप्स आणि बँड या तीन महत्वाच्या गोष्टींची खास काळजी घ्यायला हवी. तसेच चांगल्या ब्रॅंड्सचे ब्रा खरेदी करायला हवेत ज्यामुळे ते जास्तीत जास्त काळ टिकतील. दिसायला चांगली म्हणजे ती ब्रा चांगली असे म्हणता येणार नाही. ब्रा तुमच्या स्तनांच्या आकाराप्रमाणे निवडावी. ब्रा ची साईज निवडताना ती जास्त घट्ट किंवा सैल नसावी. बेल्ट जास्त घट्ट नसावा.

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

ब्रेसीयर विकत घेताना सर्वात आधी आपल्या स्तनांचा आकार व साईज लक्षात घेणे महत्वाचे असते. पूर्ण कव्हरेज असणारे ब्रा स्तनाला संपूर्णपणे आधार देते. आपण आपल्या स्तनांच्या आकार व साईजबद्दल पूर्णपणे खात्री बाळगू शकत नाही. अनेक स्त्रिया वर्षानुवर्षे एकाच प्रकारची ब्रा घालतात. त्यांच्या शरीरात बदल झालेला असतानाही त्या एकाच साईजची ब्रा वापरणे पसंत करतात. स्वत:साठी नवीन ब्रा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही नेहमी साईझ तपासा. गेल्या वर्षी जी ब्रा साईज घेतली होती ती या वर्षीही घ्यावी, अशी चूक करू नका कारण शरीरात दरवर्षी बदल होत असतात, अशी चूक करू नका. यासोबत अधिकच लूज फिटिंगची ब्रा विकत घेणे टाळा. खूप लूज फिटिंगची ब्रा विकत घेतल्याने तिथली स्किन सैल पढून भविष्यात स्तन ओघळल्यासारखे दिसू शकतात.

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

बदलत्या काळानुसार बाजारांत वेगवेगळ्या स्टाईलच्या, पॅटर्नच्या ब्रेसीयर आपल्याला पाहायला मिळतात. काहीवेळा आपण आपल्या बाहेरील कापड्यांना मॅच होणारे असे ब्रेसियरचे वेगवेगळे पॅटर्न निवडण्याचा प्रयत्न करतो. टी शर्ट, कुर्ता, शर्ट यांसारख्या वेगवेगळ्या आऊटफिट्सनुसार वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्रा आपण खरेदी करतो. परंतु या ब्रेसीयर स्टायलिश व वेगळ्या पॅटर्नच्या असल्या कारणाने काहीवेळा त्या आपल्या स्तनांना योग्य कव्हरेज देऊ शकत नाही, परिणामी अनेक समस्या उद्भवतात. अनेक स्टायलिश ब्रा वेगवेगळ्या आकाराच्या असतात. यात कप चुकीच्या आकाराचे असतात. यामुळे फारसे स्टायलिंगच्या मागे न लागता सर्वात आधी आपला कम्फर्ट पहावा.

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

एकदा ब्रेसीयर खरेदी केल्यानंतर ती पुढील सहा महिन्यांसाठी वापरणे योग्य ठरते. शक्यतो ब्रेसीयर घेतल्यानंतर ती सहा महिनेच वापरावी. काही स्त्रिया एकदा ब्रा विकत घेतल्यानंतर वर्षानुवर्षे तीच ब्रा वापरतात, अशी चूक करु नका. ब्रेसीयर वापरल्यानंतर ठराविक कालांतराने त्याचे कप्स, बँड, स्ट्रिप्स यांच्यात सततच्या वापराने फरक पडतो त्यामुळे दर सहा महिन्यांनी ब्रेसीयर बदलणे अतिशय महत्वाचे असते.

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

ब्रेसीयर विकत घेताना स्तनांच्या कम्फर्टसोबतच शरीराच्या इतर अवयवांचा देखील विचार करावा. ब्रेसियर चांगल्या ब्रॅण्डची आणि उत्तम दर्जाची असायला हवी. ब्रेसियर अशाच ठिकाणी खरेदी करा जिथे तुम्ही ती ट्राय करून विकत घेऊ शकता. अनेकदा चुकीच्या साइजमुळे आपली चरबी ब्रेसियरमधून बाहेर आल्यासारखी वाटते. तर कधी खूप घट्ट झाल्याने आपण अनकम्फर्टेबल होतो. त्यामुळे याबाबत वेळीच पुरेशी माहिती करुन घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही ब्रेसियरची खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा ब्रेसियर बँड आणि शोल्डर स्ट्रेप्सच्या खालून तुमच्या हाताची दोन बोटं सहजतेने आत जात जाऊ शकतील हे पाहून घ्या. प्रत्येक ब्रँडचा साइज चार्ट (Bra Size Chart)वेगवेगळा असू शकतो. नवीन ब्रँडच्या ब्रेसियरची खरेदी करण्यापूर्वी नेहमी साइज चार्ट तपासा.

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

आपल्याकडे महिलांचे अंतर्वस्त्र या विषयावर फारसे बोलले जात नाही किंवा संकोच वाटतो. जर आपल्याला आपली योग्य ब्रा साईज किंवा कप साईज माहित नसेल तर एक्स्पर्ट किंवा इतरांचा सल्ला घेण्यास संकोच बाळगू नये.