1 / 7साडी हा प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय आहे. सणवार असो किंवा घरातील एखादे खास फंक्शन असो चार चौघीत उठून दिसायचे असल्यास साडी हा एक उत्तम पर्याय आहे. आजकालच्या तरुणींमध्ये साडीविषयी एक वेगळीच क्रेझ आहे. स्त्री वर्गाला साडी हा प्रकार जितका आवडतो तितकंच साडी नेसताना व ती सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होतेच. असे असले तरीही साडी बद्दलची त्यांची आस्था व आवड तसूभरही कमी झालेली कधीच पाहायला मिळत नाही. विविध रंगांच्या आणि पॅटर्नच्या साड्यांसोबतच त्यांना नेसण्याचे देखील अनेक प्रकार आहेत. थंडीच्या सिजनमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारे साड्यांचे ड्रेपिंग करू शकतो ते पाहू. 2 / 7जर तुम्ही बिल्कुल नविन ढंगात साडी नेसण्याचा विचार करत आहात तर हा पर्याय खूप छान आहे. तुमच्याकडे एखादे हटके डेनिम जॅकेट असेल तर साडी नेसल्यावर त्यावर डेनिम जॅकेट घातल्यास वेस्टर्न लूक येईल. 3 / 7तुमच्याकडे पूर्ण गळा झाकून जाईल असा टर्टल नेकचा एकदा स्वेटर किंवा टीशर्ट असेल तर ब्लाऊजला पर्याय म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. या टर्टल नेक स्वेटरचा असा उपयोग केल्यास तुम्ही गॉर्जियस दिसाल. 4 / 7तुमच्या एखाद्या आवडत्या साडीवर तुम्ही फुल स्लीव ब्लाऊज शिवू शकता. फुल स्लीवचा हा ब्लाऊज दिसताना छान दिसेल व कडाक्याच्या थंडीपासून तुमच्या हाताचे संरक्षण देखील होईल. 5 / 7तुम्हाला हिवाळ्यात साडी नेसून थंडी पासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास साडी नेसल्यावर त्यावर एखादा ब्लेजर घालू शकता. साडीवर ब्लेजर घालण्याचा एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. या स्टायलिंगमुळे तुम्ही कॉर्पोरेट लूक करू शकता.6 / 7आजकाल बाजारात बेल्ट्सचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. तुम्ही लॉंग ब्लेजर घालून त्यावर कमरेभोवती एखादा हेव्ही स्टोनचा किंवा खड्यांचा बेल्ट लावू शकता. 7 / 7जर तुम्ही डिपनेक व्यवस्थित कॅरी करत असाल तर ब्लाऊजला डिपनेक देऊन बाह्या फुल स्लीव ठेवू शकता. यामुळे तुमच्या साडीला व ब्लाऊजला कमालीचा लूक येईल.