Join us

कॉटनच्या साडीचे ट्रेंडींग ५ प्रकार- दिसा सुंदर आणि राहा कम्फर्टेबल, साडी नेसल्यावर उकडणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2025 14:31 IST

1 / 7
कॉटन हा प्रकार मुळात फार आरामदायी असतो. कोणताही ऋतू असो कॉटनचे कपडे वापरणे अगदी मस्त. सैल-सुटसुटीत कपडेच घालावेत म्हणजे त्वचेलाही त्रास होत नाही. कॉटन दिसतेही छान. घरी-बाहेर कुठेही वापरता येते.
2 / 7
त्यात कॉटनची साडी म्हणजे सुखच. पूर्वी फक्त रोजच्या वापरासाठी कॉटनची साडी नेसली जायची, मात्र आजकाल सणासुदीला छान सुंदर अशा कॉटनच्या साड्या नेसल्या जातात. दिसतात सुंदर आणि त्यात गरमही होत नाही. शिवाय शरीरालाही छान आरामदायी वाटते.
3 / 7
कॉटनच्या साडीतही अनेक प्रकार आहेत, जे कोणीही नेसले तरी सुंदरच दिसतात. त्यातला एक प्रकार म्हणजे वारली प्रिंट असलेली एकरंगी साडी. दिसायला फार सुंदर आहे आणि कोणत्याही सणासाठी मस्त.
4 / 7
सध्या निळ्या रंगातील कॉटन साड्या फार लोकप्रिय आहेत. त्यावर कॉन्ट्रास्ट किंवा साधा पांढरा ब्लाऊज अशी फॅशन केली जाते.
5 / 7
एकरंगी सिंपल प्लेन साडी सध्या सगळ्या तरुणींची आवडती आहे. फार झगमग न वापरता अनेक जणी साध्या साड्या वापरणे पसंत करतात.
6 / 7
वर्षानुवर्षे विश्वासाने आणि आवडीने वापरली जाणारी कॉटन साडी म्हणजे नारायणपेठ. त्यात भरपूर प्रकार उपलब्ध असतात. प्रिंटही फार सुंदर असतात.
7 / 7
ऑफीसला जाताना किंवा फिरायला जाताना नेसण्यासाठी कॉटन चेक्स हा एक मस्त प्रकार आहे. त्यात अनेक रंग असतात. काठाला ही साडी फार हलकी असते.
टॅग्स : साडी नेसणेफॅशनसोशल व्हायरलमहिलाखरेदी