1 / 7सणासुदीचे दिवस आता सुरू झालेच आहेत. त्यामुळे या दिवसांत नेसायला आपल्याकडे वेगवेगळ्या साड्यांचे कलेक्शन हवेच.. 2 / 7त्यामुळे आता अशा काही साड्या पाहूया ज्या तुम्हाला खरोखरंच एक रॉयल आणि रिच लूक देतात. या साड्या नेसल्यावर तुमचं व्यक्तीमत्त्वही आणखी उठून दिसतं.3 / 7त्या साड्यांपैकी सगळ्यात पहिली साडी म्हणजे पैठणी. पैठणी अंगावर असली आपोआपच तुमच्या सौंदर्याला चार चाँद लागतात.4 / 7दुसरी म्हणजे ऑर्गेंझा साडी. मागील काही दिवसांपासून या साडीचा प्रचंड ट्रेण्ड आहे. लहान मोठ्या कार्यक्रमांना, पार्टीसाठी ही साडी नेसायला प्राधान्य द्या. नेसायला आणि कॅरी करायलाही ती अगदी सोपी आणि हलकी असते.5 / 7कॉटनची एखादी मस्त साडी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी. वर्किंग वुमन असाल तर सणासुदीच्या दिवसांत ऑफिसमध्ये नेसून जायला ती अगदी परफेक्ट शोभून दिसते.6 / 7कांजीवरम प्रकारातली एखादी साडीही आपल्याकडे हवीच. गणपती, महालक्ष्मी, नवरात्री या सणांना काठपदराच्या साड्याच विशेष खुलून दिसतात.7 / 7शिफॉन साडी आणि त्यावर आकर्षक ज्वेलरी असं परफेक्ट जमून आलं तर तुम्ही खूप ट्रेण्डी आणि स्टायलिश दिसू शकता.