Join us

समर स्पेशल : पॅण्टचे ५ सुंदर पर्याय-उन्हाळ्यात घालण्यासाठी हलके आणि स्टायलिश! बॉटमवेअरची लेटेस्ट फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 17:47 IST

1 / 7
उन्हाळा सुरु झाला की, आपण कॉटन आणि हलके-फुलके कपडे घालण्यास अधिक प्राधान्य देतो. अनेक महिलांना जीन्स देखील घालायला आवडत नाही. काही लोकांना ती जास्त कर्फेटेबल वाटते तर काही लोक यात अधिकच जाड वाटतात. (Summer Bottom Wear for a Professional Look)
2 / 7
उन्हाळा म्हटलं की, आपल्या जास्त गरम होऊन नये म्हणून आपण रोजच्या वापरतील कपड्यांकडे अधिक भर देतो. घामामुळे आपल्याला शरीराची दुर्गंधी येते.(Stylish Alternatives to Jeans for Summer) जीन्सही आपल्या परफेक्ट फिटिंगमध्ये बसत असेल तर आपल्याला त्याचा त्रास देखील होतो. त्यामुळे मांड्यांना रॅशेस येणे, चालताना त्रास होणे यांसारख्या समस्या सामोरे जावे लागते. जर उन्हाळ्यात आपल्याला जीन्स घालायची नसेल तर या बॉटम वेअर आपण नक्की ट्राय करु शकतो. (Best Bottom Wear for Hot Weather Office Wear)
3 / 7
उन्हाळ्यात कार्गो ट्राउझर्स हा बेस्ट पर्याय आहे. कर्फेटेबलसोबत तो आपल्याला स्टायलिश लूक देतो. यामध्ये वेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स आणि रंग पाहायला मिळतात. कार्गो पॅन्ट स्टाईल करण्यासाठी आपण टी-शर्ट किंवा क्रॉप टॉप घालू शकतो.
4 / 7
वाइड लेग पॅन्ट्सच्या फॅशनची चर्चा सध्या सुरु आहे. ही आपल्या आरामदायी आणि ग्लॅमरस लूक देईल. आपण वाइड लेग पॅन्ट ट्राय करायला हवी. कॉलेज किंवा ऑफिसमध्ये आपण सहज घालू शकतो.
5 / 7
एथनिक लूक मिळवण्यासाठी आपण टॉपसह धोती पॅन्ट घालू शकतो. उन्हाळ्यात धोती पॅन्ट खूप हलक्या आणि आरमदायी वाटतात. तसेच आपल्या लूकमध्ये देखील भर पडतो.
6 / 7
जॉगर्स पॅन्ट ही खूप आरामदायी पॅन्ट आहे. सध्या ती खूप ट्रेंडमध्ये आहे. आरमदायी असण्यासह ती आपल्याला स्टायलिश लूक देते. यासोबत घालण्यासाठी क्रॉप टॉप किंवा शर्ट बेस्ट पर्याय आहे.
7 / 7
कुर्ती किंवा टॉपसोबत आपल्या कपाटात पलाझो पॅन्टचा समावेश करु शकतो. याच्या वेगळ्या डिझाईन्समुळे आपल्याला एथनिक आणि फॉर्मल लूक मिळेल.
टॅग्स : फॅशनमहिला