पावसाळ्यात तुमच्याकडे हव्याच ‘या’ ४ साड्या, सहज नेसता येतील इतक्या कम्फर्टेबल आणि स्टायलिशही

Updated:May 30, 2025 18:26 IST2025-05-30T12:33:35+5:302025-05-30T18:26:18+5:30

पावसाळ्यात तुमच्याकडे हव्याच ‘या’ ४ साड्या, सहज नेसता येतील इतक्या कम्फर्टेबल आणि स्टायलिशही

काही साड्या अशा असतात ज्या विशिष्ट ऋतूमध्ये खूप जास्त आरामदायी ठरतात. उदाहरणार्थ कॉटनच्या साड्या विशेषत: उन्हाळ्यात घातल्या जातात. कारण त्या साड्यांमुळे उन्हाळ्यात जास्त गर्मी होत नाही.

पावसाळ्यात तुमच्याकडे हव्याच ‘या’ ४ साड्या, सहज नेसता येतील इतक्या कम्फर्टेबल आणि स्टायलिशही

त्याचप्रमाणे काही साड्या अशाही आहेत ज्या पावसाळ्यात खूप जास्त आरामदायी ठरतात. एखाद्यावेळी तुम्ही पावसात भिजलात तरी त्या लवकर वाळतात. त्या साड्या नेमक्या कोणत्या ते पाहूया..

पावसाळ्यात तुमच्याकडे हव्याच ‘या’ ४ साड्या, सहज नेसता येतील इतक्या कम्फर्टेबल आणि स्टायलिशही

सगळ्यात पहिली आहे शिफॉन साडी. तुम्ही जर ९० च्या दशकातील बॉलीवूड सिनेमे पाहिले तर बहुतांश अभिनेत्रींच्या अंगावर याच साड्या दिसून येतात. या साड्या अतिशय क्लासिक लूक देतात आणि नेहमीच ट्रेण्डी वाटतात.

पावसाळ्यात तुमच्याकडे हव्याच ‘या’ ४ साड्या, सहज नेसता येतील इतक्या कम्फर्टेबल आणि स्टायलिशही

दुसरा प्रकार म्हणजे जाॅर्जेट साड्या. थोडा स्टायलिश लूक हवा असेल तर जॉर्जेट साड्यांना पसंती द्या. त्यामध्ये जॉक्वार्ड जॉर्जेट, सिल्क जॉर्जेट, सॅटीन जॉर्जेट असे वेगवेगळे प्रकार मिळतात आणि प्रत्येक प्रकाराचं सौंदर्य वेगळं आहे.

पावसाळ्यात तुमच्याकडे हव्याच ‘या’ ४ साड्या, सहज नेसता येतील इतक्या कम्फर्टेबल आणि स्टायलिशही

सिल्क प्रकारातल्या क्रेप सिल्क, कॉटन सिल्क या साड्याही पावसाळ्यात वापरायला चांगल्या आहेत. कारण त्या भिजल्या तरी लवकर वाळतात. शिवाय त्या लाईटवेट असल्याने भिजल्यानंतरही अंगावर खूप जड होत नाहीत.

पावसाळ्यात तुमच्याकडे हव्याच ‘या’ ४ साड्या, सहज नेसता येतील इतक्या कम्फर्टेबल आणि स्टायलिशही

मल कॉटन प्रकारातल्या साड्याही पावसाळ्यात वापरायला खूप आरामदायी असतात. त्यामुळे या प्रकारची एखादी साडी आपल्या कलेक्शनमध्ये हवीच.