Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Budget 2026: निर्मला सीतारामन यांनी सादर केले बजेट, ९ वर्षांच्या ९ बजेट स्पेशल साड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2026 14:38 IST

1 / 11
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६ चा अर्थसंकल्प सादर करताना केवळ आर्थिक धोरणांवरच नाही, तर भारतीय परंपरेवरही पुन्हा एकदा ठसा उमटवला.मागच्या ९ वर्षांत प्रत्येक बजेटवेळी त्यांनी परिधान केलेली साडी ही केवळ कपड्यांची निवड न राहता, देशाच्या हातमाग, संस्कृती आणि स्थानिक कारागिरांच्या कलेचं प्रतीक ठरली आहे.
2 / 11
पाहूयात मागच्या ९ अर्थसंकल्पात परिधान केलेल्या साड्या आणि त्यांची खासियत
3 / 11
२०२६ च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आपल्या मूळ राज्याची म्हणजेच तामिळनाडूची कांजीवरम सिल्क साडी निवडली आहे. ही साडी मॅजेंटा रंगाची असून तिला गडद तपकिरी बॉर्डर आहे. यावर खास लोकरीची शाल परिधान केली आहे.
4 / 11
पद्मश्री दुलारी देवी यांनी भेट दिलेली मधुबनी पेंटिंगची साडी २०२५ मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली होती. बिहारच्या सांस्कृतिक कलेला जागतिक स्तरावर नेण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता.
5 / 11
२०२४ अंतरिम निवडणुकीपूर्वीच्या बजेटमध्ये त्यांनी पश्चिम बंगालाच्या'कान्था' वर्कची निळी साडी नेसली होती. निळा रंग स्थिरता आणि डिजिटल क्रांतीचा मार्ग दाखवतो.
6 / 11
२०२४ च्या जुलै महिन्यातील पूर्ण बजेटमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातली पांढरी मंगलगीरी साडी निवडली होती. पांढरा रंग हा स्वच्छ प्रतिमेचे प्रतीक आहे.
7 / 11
२०२३ मध्ये कर्नाटकच्या धारवाडमधील 'कसुती' एम्ब्रॉयडरी असलेली ही लाल साडी 'नारी शक्ती'चे संयमी स्वरुप दर्शविणारी साडी नेसली होतील.
8 / 11
२०२२ मध्ये ओडिसाच्या कारागिरांनी विणलेली तपकिरी रंगाची बोमकाई साडी त्यांनी नेसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि 'जमिनीशी जोडलेल्या' धोरणांना महत्त्व दिले.
9 / 11
२०२१ मध्ये निर्मला सितारामन यांनी तेलंगणाच्या प्रसिद्ध इकत कलेची साडी आणि त्यावर 'कश्मीरी पश्मीना' शाल परिधान केली होती. यात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुंदर मिलाफ होतो.
10 / 11
२०२० मध्ये त्यांनी गडद पिवळी साडी नेसली होती. हा रंग समृद्धी आणि शुभ शकुनाचे प्रतीक मानला जातो.
11 / 11
टॅग्स : अर्थसंकल्प २०२६फॅशननिर्मला सीतारामनमहिला