1 / 11१. कम्पिट वेस्टर्न किंवा पुर्णपणे इंडियन असा लूक न करता अधिक स्टायलिश दिसण्यासाठी सध्या इंडोवेस्टर्न लूक ट्रेंडिंग आहे. लग्नसराईमध्ये तर असे लूक हमखास भाव खाऊन जातात.2 / 11२. काजोलचं स्वत:च असं एक वेगळंच स्टाईल स्टेटमेंट आहे. म्हणूनच तर तिच्या ड्रेसिंग आणि फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा होत असते. काजोलने इंडोवेस्टर्न लूक असणारा तिचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याला My Indo-western alter- egoा अशी कॅप्शन तिने दिली आहे. 3 / 11३. लग्नसराईतच नव्हे तर एखाद्या पार्टीसाठी किंवा मग आऊटींगसाठीही तुम्ही इंडोवेस्टर्न लूक कॅरी करू शकता.4 / 11 ४. सोनम कपूरचा हा लूक एखाद्या कॅज्युअल ओकेजनसाठी छान आहे. साधा, सिंपल पण तेवढाच कॅची असणारा हा लूक तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा वेगळं बनवतो.5 / 11 ५. धकधक गर्ल माधुरी दिक्षितचे हे बघा एका पेक्षा एक जबरदस्त आकर्षक असणारे इंडोवेस्टर्न लूक.. अशा कोणत्याही पद्धतीचं ड्रेसिंग एखाद्या लग्नसराईमध्ये छान दिसू शकतं.6 / 11६. परिणितीचा हा लूक देखील खास आहे.. अशा पद्धतीची वेशभुषा करायची असल्यास गडद रंगांना प्राधान्य द्यावे.7 / 11 ७. क्रॉप टॉप आणि स्कर्ट अशा पद्धतीचा आलिया भटचा लूक तिला अतिशय हॉट लूक देणारा आहे.8 / 11८. साडीमध्ये सुंदर दिसणारी विद्या इंडो- वेस्टर्न प्रकारच्या कपड्यांमध्येही अतिशय आकर्षक दिसते. सिंपल पण हटके लूक हवा असेल तर विद्याची ही स्टाईल बेस्ट आहे. 9 / 11 ९. एखाद्या पार्टीसाठी तयार होताना मीरा कपूरचा हा लूकही नक्कीच विचारात घ्या. अशा पद्धतीचे कपडे कॅरी करताना तुमच्यात कॉन्फिडन्स मात्र जबरदस्त हवा.10 / 11 १०. इंडोवेस्टर्न लूक करायचं असेल तर ॲक्सेसरीजवर विशेष लक्ष द्यावं लागेल. कारण बघा काजोलचा हा लूक खुलून आला आहे तो तिच्या ट्रेण्डी ॲक्सेसरीजमुळेच. सिंपल कुर्ता पण त्यावर स्टायलिश ॲक्सेसरीज 11 / 11११. अमृता खानविलकर या लूकमध्ये नक्कीच अधिक बोल्ड दिसते आहे.