Saiyaara : सैयारात वाणीची मुख्य भूमिका करणारी अनीत पड्डा नक्की कोण? काजोलसोबतही केलंय यापूर्वी काम!
Updated:July 23, 2025 16:15 IST2025-07-23T16:03:45+5:302025-07-23T16:15:07+5:30
Saiyaara: Who exactly is Aneet Padda, who plays the lead role of Vaani in Saiyaara? She has also worked with Kajol before! : सध्या फार गाजलेला चित्रपट म्हणजे सैयारा. पाहा नक्की त्यातील मुख्य अभिनेत्री कोण आहे. दिसायला अगदीच सुंदर.

सध्या सगळ्याच चित्रपटगृहांमध्ये जोरदार चालणारा सिनेमा म्हणजे सैयारा. ( Saiyaara) एखाद्या लव्हस्टोरीची अशी लाट येते की सगळे प्रेक्षक त्या चित्रपटाचा भाग असल्यासारखे वागतात. तसेच काहीसे या चित्रपटाबाबत होत आहे. याआधीही लोकांनी अनेक चित्रपट डोक्यावर उचलून धरले होते.
सैयाराचे अनेक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. कोणी ब्रेकअपमुळे रडताना दिसते तर कोणी आपल्या प्रियकरासोबत नाचताना दिसते. मोहित सुरीने कमालीचा कम बॅक करत आणखी एक हिट प्रेमकहाणी प्रदर्शित केली. त्यातली मुख्य अभिनेत्री फार लोकप्रिय ठरली.
अनीत पड्डा ही एक २२ वर्षीय तरुणी सध्या फार चर्चेत आहे. तिची भूमिका लोकांना फार आवडली असून अनीताचे चाहते वाढत चालले आहेत. १४ ऑक्टोबर २००२ साली अनिताचा जन्म अमृतसर येथे झाला.
अनीतने तिच्या प्रवासाची सुरवात सलाम वेंकी या २०२२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून केली. तिची भूमिका अगदीच लहान होती. मात्र काजोलसोबत तिला काम करायची संधी मिळाली. त्यातूनच पुढे तिला २०२४ मध्ये बिग गर्ल्स डोंन्ट क्राय या प्राईमच्या वेब सिरीजमध्ये अभिनय करायची संधी मिळाली.
अनीत मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. तिने स्वत:च्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. दोन लहान भूमिकांनंतर मिळालेली ही भूमिका मात्र तिच्यासाठी फारच यशस्वी ठरली. सैयारा हा सिनेमा सध्या प्रचंड कमाई करत आहे. तसेच त्याचा दुसरा भाग येईल अशीही चर्चा सुरु आहे.
दिल्ली युनिव्हर्सीटीमधून शिक्षण घेणारी अनीत आता नॅशनल क्रश झाली आहे. अनीतसोबत अहान पांडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अहानही फार गाजला. त्याचा अभिनय प्रेक्षकांनी चांगलाच गौरवला. अनीत आणि अहान यांची जोडी बेस्ट आहे असे नेटकरी म्हणतात.
अनीतने टिव्हीवर लहान भूमिका तसेच मॉडलिंग आणि इतर लहान-मोठी कामं करत हे यश मिळवले आहे. आता पुढे तिची कामगिरी कशी होते ते बघायचं.