सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

Updated:April 9, 2025 17:19 IST2025-04-09T17:14:23+5:302025-04-09T17:19:57+5:30

Sai Pallavi to be seen in the role of Sita, photos goes viral : साई पल्लवी चाहत्यांना सीता म्हणून अगदीच मान्य. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे होत आहे फार कौतुक.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

भारतात अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. अभिनय तसेच नृत्यही त्या उत्तम करतात. तरीही एक अभिनेत्री सगळ्यांमधून उठून दिसते ते तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी. अशी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करणारी साई पल्लवी फक्त साऊथमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. ती फार सोज्वळ व संस्कृती जपणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

साई पल्लवी चेहरा सुंदर दिसावा म्हणून मेकअप करत नाही. तसेच चित्रपटांमध्येही ती फार नट्टापट्टा करत नाही. तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ती कायम चर्चेत असते.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

सध्या साई पल्लवी एका चित्रपटासाठी मुंबईमध्ये आलेली आहे. या चित्रपटाची चर्चा आता सगळीकडे चालू आहे. या चित्रपटामध्ये साई पल्लवी व रणबीर कपुर एकत्र दिसणार आहेत. चित्रपट रामायणावर आधारित असून साई पल्लवी माता सीतेच्या भुमिकेमध्ये दिसणार आहे. रणबीर रामाची भूमिका करणार आहे.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

याआधी कृती सॅनेनने सीतेची भूमिका केली होती. मात्र त्या भुमिकेसाठी कृती प्रचंड ट्रोल झाली. पण साई पल्लवीच्या बाबतीत तसे काहीच न घडता साईसारखी साधी मुलगीच सीतेची भूमिका करू शकते अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांची आहे.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

चित्रपटाचे चित्रिकरण सध्या चालू आहे. त्या दरम्यान साई पल्लवीच्या सीतेच्या भुमिकेतील लूकचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये साई पल्लवीने केशरी साडी नेसली होती. अगदी मोजकेच दागिने घातले होते.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

साई पल्लवी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे तिला ब्यूटी ट्रिटमेंट्सबद्दल ज्ञान आहे. २०१९ मध्ये तिने एका फेअरनेस क्रिमच्या कंपनीची २ कोटी रुपयांची जाहिरात नाकारली होती. नैसर्गिक सौंदर्यालाच साई पल्लवी महत्त्व देते.

सीतेच्या भूमिकेत दिसणार साई पल्लवी, फोटो व्हायरल- साई पल्लवीच्या नो मेकअप लूकची खास चर्चा

नितेश तिवारी यांनी रामायण सिनेमासाठी साई पल्लवीला निवडले. म्हणून चाहते दिग्दर्शकाचेही कौतुक करत आहेत. सीता सोज्वळ असायला हवी आणि ते फक्त एक पात्र नसून लोकांच्या भावनांचा विषय असल्यामुळे कास्टींग करताना व्यवस्थित विचारपूर्वकच करणे गरजेचे आहे. असे चाहत्यांचे मत आहे.