Join us   

नाटू.. नाटू म्हणत गोल्डन ग्लाेब पुरस्कार जिंकणाऱ्या 'RRR' स्टार्ससोबत उपासना कामिनेनीचीही चर्चा, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 4:23 PM

1 / 6
१. सध्या प्रचंड गाजत असणाऱ्या 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली, संगीत दिग्दर्शक एम. एम. किरवानी, तेलगु सुपरस्टार रामचरण असे सगळेच उपस्थित होते.त्यासोबतच सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या ते रामचरणची पत्नी उपासना कामिनेनीवर.
2 / 6
२. उपासना आणि रामचरण ही दक्षिणेतील एक सुपरस्टार जोडी म्हणून ओळखली जाते. चित्रपटसृष्टीशी उपासनाचा थेट संबंध नसला तरी तिची लोकप्रियता मात्र अफाट आहे. तिचा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे.
3 / 6
३. विशेष म्हणजे तिची ओळख केवळ रामचरणची पत्नी एवढीच मर्यादित नाही. तर ती स्वत: एक बिझनेस वुमन असून अपोलो लाईफची व्हाईस प्रेसिडंट आहे. शिवाय बी पॉझिटीव्ह या मासिकाची ती एडिटर- इन- चीफ देखील आहे.
4 / 6
४. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात उपासनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे तिची सुंदर साडी, कपाळावर छान शोभेल अशी टिकली अशा पारंपरिक भारतीय वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी झाली होती. वेस्टर्न वेअरपेक्षा साडी नेसण्याकडे उपासनाचा नेहमीच कल असतो. म्हणूनच तर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कार सोहळ्यासाठीही तिने साडीचीच निवड केली.
5 / 6
५. निळ्या- पर्पल रंगाच्या तिच्या बांधणी साडीवर अजरख प्रिंट होते. साडीचा रंग तिलाशोभून दिसत होता. चेहऱ्यावर उठून दिसणारी टिकली आणि अतिशय साधा पण तेवढाच सुंदर मेकअप यामुळे ती अतिशय आकर्षक दिसत होती.
6 / 6
६. उपासना गरोदर असल्याची चर्चा आहेच. त्यात हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार या स्टार कपलचा आनंद द्विगुणित करणारा आहे.
टॅग्स : सेलिब्रिटीराम चरण तेजागोल्डन ग्लोबआरआरआर सिनेमा