Join us   

मला कपड्याची ॲलर्जी आहे म्हणणारी, कायम वादग्रस्त ठरणारी उर्फी जावेद नक्की आहे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2023 12:04 PM

1 / 8
टीव्ही अभिनेत्री असलेली उर्फी जावेद तिच्या कपड्यांच्या फॅशनवरुन कायमच चर्चेत असते. आता तर तिच्या कपड्यांवरुन वाद चांगलाच पेटला असून या वादाने राजकीय वळण घेतले आहे (Know Who is Actress Urfi Javed Photos).
2 / 8
मूळ लखनौ मधील असलेल्या उर्फीने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले असून कमीत कमी कपडे घालून अंगप्रदर्शन करण्यावरुन उर्फीला कायम ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगकडे विशेष लक्ष न देता ती कपड्यांच्या बाबतीत सतत काही ना काही प्रयोग करत असते.
3 / 8
अवघ्या २५ वर्षांच्या उर्फीचे सोशल मीडीयावरही मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग असून तिनी नवीन एखादी फॅशन केली रे केली की सोशल मीडियावर तिच्याविषयी चर्चा रंगताना दिसते.
4 / 8
बोल्ड कपड्यांबरोबरच बोल्ड वक्तव्यांमुळेही उर्फी अनेकदा चर्चेत असते. नुकत्याच तिच्याबाबत कपड्यांवरुन सुरू असलेल्या वादातही तिने अतिशय बोल्ड उत्तरे दिल्याने हा वाद चिघळल्याचे दिसते.
5 / 8
वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन करणारी उर्फी प्रत्येक प्रकारचे कपडे तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी करत असल्याने त्यामध्ये ती कम्फर्टेबल असल्याचे पाहायला मिळते.
6 / 8
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला योग्य कपडे घालत नसल्याने अटक करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यावरुन शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेत या वादाला आणखी नवे तोंड फोडले. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उर्फीवर टिका करण्यावरुन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती.
7 / 8
उर्फी कधी दोऱ्यांनी तयार केलेले कपडे घालते तर कधी प्लास्टीकपासून तर कधी आणखी कोणत्या गोष्टींपासून तयार केलेले कपडे घालत फॅशन कॅरी करताना दिसते. या फोटोत तिने घातलेले कपडे काचेच्या तुकड्यांपासून तयार केले आहेत. आपल्याला अंगावर रॅश येत असल्याने आपण कमी कपडे घालतो अशी बचावात्मक भूमिका उर्फीने नुकतीच घेतली होती.
8 / 8
उर्फीने कमी कपडे घालण्याबरोबरच बरेचदा टॉपलेस फोटोशूटही केले आहे. नुकतेच तिने हातात खाण्याचे पदार्थ घेत एक टॉपलेस शूट केले होते. तर त्याआधी तिने अशाप्रकारे अंगाला फक्त फुले चिकटवत आगळीवेगळी फॅशन कॅरी केली होती.
टॅग्स : सेलिब्रिटीउर्फी जावेद