1 / 8भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नताशा स्टॅनकोविकशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले, पण सध्या महिका शर्मा (Mahika Sharma) हे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला. जाणून घेऊया तिच्याबद्दल.. (Who is Mahieka Sharma?)2 / 8महिका शर्मा ही मूळची दिल्लीची रहिवासी असून ती एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने इकॉनॉमिक्स आणि फायनान्स (Economics and Finance) मध्ये उच्च शिक्षण घेतले आहे.(Is Hardik Pandya Dating Mahieka Sharma?)3 / 8महिकाने फॅशन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनिष मल्होत्रा, अनीता डोंगरे आणि तरुण तहिलियानी यांसारख्या दिग्गज डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे.4 / 8मॉडेलिंगसोबतच तिने अभिनयातही आपलं नशीब आजमावलं आहे. २०१९ मध्ये आलेल्या ओमंग कुमार यांच्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात तिने अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत काम केले होते.5 / 8नुकत्याच झालेल्या 'आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कप'मध्ये भारताच्या विजयानंतर, मैदानावर हार्दिक पांड्याला मिठी मारताना आणि त्याच्याबद्दल जाहीर प्रेम व्यक्त करताना महिका दिसली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.6 / 8महिकाने हार्दिकसाठी सोशल मीडियावर 'The man, the myth, the legend' अशी स्टोरी शेअर केली, जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 7 / 8वर्ल्ड कपदरम्यान महिका केवळ हार्दिकसोबतच नाही, तर त्याचा मुलगा अगस्त्य याच्यासोबतही वेळ घालवताना दिसली, ज्यामुळे ती अधिक चर्चेत आली. 8 / 8यापूर्वी महिकाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक पांड्याने खास सेलिब्रेशन केले होते, तेव्हापासूनच या दोघांच्या डेटिंगच्या अफवांना सुरुवात झाली.