1 / 7दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा... जागतिक मैत्री दिन हा दिवस ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो. दोन मैत्रिणी कधीच एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी बनू शकते नाही असं नेहमीच म्हटलं जाते. बॉलिवूड चित्रपटातही असं दाखवलं जातं. त्यातील अनेक सेलिब्रेटी एकमेकांना पाण्यात पाहतात. (Bollywood friendship movies)2 / 7बॉलिवूडचे असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चेत आहेत. बेस्ट फ्रेंड्सच्या यादीत किती फेमस जोड्या आहेत ते पाहूयात. (Bollywood celebrities friendship)3 / 7'ये जवानी है दिवानी' मधील अदिती आणि नैनीची जोडी अधिक लोकप्रिय झाली. अदिती बिनधास्त आणि निडर तर नैना ही थोडी शांत मुलगी. पण या दोघांच्या मैत्रीने सगळ्यांना जगणं शिकवलं. 4 / 7गर्ल गँग अर्थात 'वीरे दी वेडिंग' मधील कालिंदी, अवनी, साक्षी आणि मीरा. या चित्रपटात मैत्रीणींच्या ग्रुपने आयुष्याच्या विविध प्रसंगातून मैत्री कशी अधिक घट्ट करायची हे शिकवलं. 5 / 7'कॉकटेल'मधील वेरोनिका आणि मीरा यांनी आपल्या गुंतलेल्या नात्याला कसं सांभाळावं. जिने आपल्या कठीण काळात सोबत दिली, पुन्हा जगायला लावलं. खरंच मैत्री असावी तर अशी...6 / 7'द क्रू' मधील जास्मिन, गीता आणि दिव्या यांची मैत्री तर क्राइम पार्टनरसारखी. अगदी कठीण प्रसंगात एकमेकांचा हात सोडायचा नाही. अगदी कोणत्याही प्रसंगात ठामपणे एकमेकांच्या सोबत उभ राहायचं असं यांच्या मैत्रीच गणित. 7 / 7'पिंक' मधील मीनल, फालक आणि अँड्रिया यांची मैत्री तर अनोखीच. अगदी वास्तविक जीवनात घडणाऱ्या घडामोडी, मैत्रीच अतूट नात, नात्यांच न उलगडलेलं कोड आणि गरज पडली तर मैत्रिणीसाठी ठाम उभ राहायचं हे यांनी शिकवलं.