1 / 7बिहारमधील तरुण आणि प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर भारतीय लोकगीत आणि शास्त्रीय संगीताच्या जगातून राजकारणात आली. (Bihar politics)2 / 7एक हसरी गोड गळ्याची मुलगी राजकारणात येणार म्हणून तिच्यावर टिकाही झाली. तिच्या वडिलांनी दबावातून तिला राजकारणात आणले अशीही चर्चा समाजमाध्यमात होती. (Maithili Thakur news)3 / 7बिहार निवडणुकीपूर्वी ती भाजपात दाखल झाली. तिला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली. ती राजदचे विनोद मिश्रा आणि जनसुराज पक्षाचे बिप्लब कुमार चौधरी यांच्याविरोधात उभी ठाकली.4 / 7मधुबनी जिल्ह्यात जन्मलेली मैथिली ठाकूर हिला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तिच्या आजोबांकडून लोकसंगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण तिला मिळाले. अतिशय कष्टातून तिनं आपली ओळख कमावली. ती पत तिनं आणि तिच्या वडिलांनी एनकॅश करायचं ठरवलं.5 / 7२०१७ मध्ये तिने 'रायझिंग स्टार इंडिया' या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तिच्या आवाजामुळे तिला देशभरात ओळख मिळाली. भाजपाला तरुण, महिला चेहऱ्याची गरज होतीच त्यातून त्यांनी मैथिलीला तिकिट दिलं.6 / 7सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं लोकप्रियता कमावलीच. गातेही उत्तमच. तिला संगीत नाटक अकादमीकडून लोकसंगीतातील योगदानाबद्दल उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार देखील मिळाला. हिंदीवर उत्तम प्रभूत्व आणि निरागस चेहरा ही तिची अजून मोठी ताकद.7 / 7मैथीलीनं कष्टानं गायिका म्हणून ओळख कमावली, आता आमदार म्हणून ती पुढं काय करते ते पहायचं..