World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

Updated:July 30, 2025 12:46 IST2025-07-30T12:34:37+5:302025-07-30T12:46:09+5:30

World Lipstick Day : तुम्ही कधी विचार केला आहे का की दररोज लिपस्टिक लावल्याने तुमच्या ओठांचं किती नुकसान होतं?

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

लिपस्टिक हा प्रत्येक महिलेच्या ब्युटी किटचा एक महत्त्वाचा भाग आहे. महिला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या शेड्सच्या लिपस्टिक वापरतात. ऑफिससाठी न्यूड टोन आणि पार्टीसाठी ब्राइट रेड. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दररोज लिपस्टिक लावल्याने तुमच्या ओठांचं किती नुकसान होतं?

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

आज वर्ल्ड लिपस्टिक डेनिमित्त दररोज लिपस्टिक लावणं किती सुरक्षित आहे. त्यामुळे काय होतं आणि लिपस्टिकबद्दल तज्ज्ञ नेमकं काय म्हणतात हे जाणून घेऊया.

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

ओठांची त्वचा खूप पातळ असते आणि त्यात ऑईल ग्लँड्स नसतात. यामुळेच ते कोरड्या होतात. कमी दर्जाच्या लिपस्टिकमध्ये सिंथेटिक डाय, प्रिझर्व्हेटिव्ह्ज असल्याने एलर्जिक रिएक्शन आणि ओठ फाटू शकतात.

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

जर तुम्ही दररोज लिपस्टिक लावत असाल आणि त्या लिपस्टिकची डर्मेटोलॉजिस्ट टेस्टेड असेल, त्यात व्हिटॅमिन ई, स्क्वालेन किंवा नॅचरल ऑईलसारखे मॉइश्चरायझिंग घटक असतील तर ती वापरणं सुरक्षित आहे. काही लिपस्टिकमध्ये लीड किंवा कॅडमियमसारखे हेवी मेटल असतात जे हानिकारक ठरू शकतात.

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

नाव जरी ऑर्गेनिक असलं तरी ती १०० टक्के सुरक्षित असेलच असं नाही. कधीकधी नैसर्गिक घटकांमुळे देखील एलर्जी होऊ शकते. जसं की पेपरमिंट ऑइल किंवा सायट्रस एक्सटॅक. याशिवाय काही तज्ज्ञ म्हणतात की, सर्वात सुरक्षित लिपस्टिक ती असते जी क्लिनिकली टेस्टेड असते आणि त्याचं सिंपल फॉर्म्युलेशन असतं.

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

जर तुम्ही दररोज लिपस्टिक वापरत असाल तर तुम्ही स्किन केअर रुटीन देखील फॉलो करायला पाहिजेत. लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही एसपीएफ असलेला लिप बाम लावावा.

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

रात्रीच्या वेळी ओठांवरची लिपस्टिक नीट काढून टाकावी. आठवड्यातून एकदा ओठांचं जेंटल एक्सफोलिएशन केलं पाहिजे. याशिवाय, तुम्ही रात्री लिप बाम किंवा लिप मास्क देखील लावू शकता.

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

तज्ज्ञांच्या मते, लिपस्टिक खरेदी करताना, हायपोअलर्जेनिक, फ्रेगरन्स फ्री आणि डर्मेटोलॉजिस्ट टेस्टेड लेबल तपासा. तसेच जर त्यात शिया बटर, जोजोबा ऑईल, सिरॅमाइड्स, व्हिटॅमिन ए सारखे घटक असतील तर ती जास्त चांगली आहे.

World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांधे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड

ग्राहक आता गोष्टींबद्दल अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यांनी उत्पादनांमधील घटक, पारदर्शकता आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे, जी एक चांगली सुरुवात आहे. तज्ज्ञांच्या मते विचार करून ब्यूटी प्रोडक्ट निवडणं अत्यंत गरजेचं आहे.