1 / 8केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी केस विंचरण्याकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवे. केसगळती रोखण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. परंतु, विंचरताना काही चुका केल्या तर केस जास्त गळू लागतात. (Best comb for hair fall control)2 / 8आपल्यापैकी अनेकजण केसांसाठी प्लास्टिकचा, नायलॉनचा कंगवा वापरतात. ज्यामुळे केस त्याच्यात अडकून तुटतात. असे कंगवे आपल्या केसांसाठी अधिक नुकसान पोहोचवतात. (Wrong comb causes hair breakage )3 / 8प्लास्टिक किंवा नायलॉनचे कंगवे वापरल्याने केस तेलकट होऊन टाळूचे नुकसान होते. अशावेळी केसांसाठी कोणता कंगवा वापरायला हवा जाणून घेऊया. 4 / 8मोठे दात असलेले कंगवे आपल्या टाळू आणि केसांच्या टोकांवर गुंता काढून टाकण्यास मदत करतात. तसेच केसांच्या टाळूला निरोगी ठेवतात. 5 / 8रॅटेल कंगवा हे सिल्की केसांसाठी चांगले आहे. या कंगव्यामुळे आपल्याला विविध हेअर स्टाइल करता येतात. 6 / 8पॅडल ब्रश हा आपल्या केसांना सॉफ्ट करण्यास मदत करतो. हा साधरणत: केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी वापरला जातो. हा कंगवा लांब-जाड आणि कुरळे केसांसाठी वापरला जातो. 7 / 8कुशन ब्रश हा केसांना रेशमी आणि चमक आणण्यासाठी वापरला जातो. आपली टाळू खूप नाजूक असते. यामुळे टाळूला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. 8 / 8गोल आकाराचा ब्रश हा स्टायलिंग म्हणून वापरला जातो. हा सर्व प्रकारच्या केसांसाठी चांगला आहे. याचा वापर करुन केसांना सरळ किंवा कुरळे करता येते.