ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

Updated:January 6, 2025 11:38 IST2025-01-06T11:29:43+5:302025-01-06T11:38:26+5:30

ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

हिवाळ्यात तर अनेकांचे ओठ कोरडे पडतात. कारण या दिवसांत वातावरणच असं असतं की त्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते. पण एरवी उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यातही अनेक जणांचे ओठ फाटलेले दिसतात.(what is the reason for dry, black lips?)

ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

ओठांवर भेगा दिसतात आणि कधी कधी तर ओठांवरचे पांढरे सालसुद्धा निघते (Why do lips peel constantly?). असा त्रास होत असेल तर ती तुमचं शरीर तुमच्या आरोग्याविषयी देत असलेली एक सूचना आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका असं आयुर्वेद अभ्यासक सांगतात.

ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ merishrushti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ओठ कोरडे पडून सतत ओठांची सालं निघत असतील तर तुमच्या शरीरातला वात वाढलेला आहे.

ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

असं झाल्यास ओठ पुन्हा मऊ- मुलायम करण्यासाठी तुम्ही एक तूप आणि साखर एकत्र करून ओठांना हळूवारपणे मसाज करू शकता. मसाज केल्यानंतर एखाद्या मिनिटाने ओठ धुवून टाका.

ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

आता तुम्हाला जर शरीरातला वात कमी करायचा असेल तर त्यासाठी एक ग्लास गरम पाणी घेऊन त्यात १ चमचा तूप टाकून ते सकाळी रिकाम्यापोटी प्या. यामुळेही शरीरातला वाढलेला वात बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

ओठ सतत कोरडे पडणे, ओठांचे साल निघणे हे साधे लक्षण नाही, तुम्हाला असू शकतो 'हा' त्रास

सतत कोरडे पदार्थ खाणे, थंड पदार्थांचे अतिसेवन, खारवलेले- आंबवलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे यामुळेही शरीराचा वात वाढतो. त्यामुळे काही दिवस असे पदार्थ खाणं टाळल्यास ओठांना लवकर आराम मिळतो.