Join us   

वय कमी पण केस पिकलेत? मेहेंदीत 'हा' सिक्रेट पदार्थ मिसळून लावा; काळे-शायनी होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 8:37 AM

1 / 7
वाढत्या वयात केस पांढरे होणं हे कॉमन आहे. पण काहीजणांचे तरूणपणातच केस पांढरे होऊ लागले आहेत. (Grey Hairs Solution) वय कमी असताना केस काळे करण्यासाठी डाय वापरणं अनेकदा भितीदायक वाटतं, डाय लावल्यावर आपले केस कायमचे पांढरे होतील का असं त्यांना वाटतं. (How to Apply Henna Hair Dye)
2 / 7
केमिकल्सयुक्त डायमुळे केसांचं बरंच नुकसान होतं. यामुळे केस मुळांपासून कोरडे होतात. म्हणूनच अनेकजण केसांना मेहेंदी लावणं पसंद करतात. चांगल्या रिजल्टसाठी केसांना मेहेंदी लावताना काही पदार्थ मिसळेल तर चांगला परिणाम दिसून येईल.
3 / 7
पांढरे केस काळे करण्यासाठी एक मोठ्या भांड्यात ४ ते ५ चमचे मेहेंदी पावडर मिसळा. त्यात २ चमचा काळा चहा घाला. आता ही पेस्ट बनवण्यसाठी पाण्यात मिसळा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. काळा चहा मेहेंदीत मिसळण्याऐवजी तुम्ही चहाचं पाणी मेहेंदीत मिसळू शकता.
4 / 7
या पद्धतीनं मेहेंदी केसांना लावल्यास जास्त गडद रंग दिसून येईल. नॅच्युरल मेहेंदी पावडर न घेता डेव्हलपरसह मिळणाऱ्या मेहेंदीची निवड करा.
5 / 7
मेंहेदीची पेस्ट तयार झाल्यानंतर कमीत कमी ८ तासांसाठी वेगळी ठेवून द्या रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशीही तुम्ही लावू शकता. पांढऱ्या केसांवर मेहेंदी अर्धा ते एक तास लावून ठेवा नंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा केस धुताना शॅम्पूचा वापर करू नका. शॅम्पूमुळे मेहेंदीचा रंग निघू शकतो. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा.
6 / 7
मेहेंदी भृंगराज आणि आवळ्यासह मिसळून लावल्यास केसांना अधिकाधिक फायदे मिळतील. यामुळे स्काल्पवरील पीएच लेव्हल बॅलेंन्स राहील.
7 / 7
एस्क्ट्रा ऑईल प्रोडक्शन नियंत्रणात राहील. याशिवाय केसांचा कोरडेपणाही दूर होईल.मेहेंदी केसाचं गळणं थांबवण्यासाठीही उपयुक्त ठरते. यामुळे केस मऊ आणि सिल्की राहतात.
टॅग्स : केसांची काळजीब्यूटी टिप्स