Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रश्मिका मंदानाने लग्नात कपाळाला काय बांधलं होतं? पाहा मराठी मुंडावळ्या ते बंगाली मुकूट, प्रत्येक प्रांताची खास प्रथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2026 16:52 IST

1 / 6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या विवाह सोहळ्यातील दागदागिन्यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
2 / 6
अशातच एका गोष्टीचीही चर्चा आहे आणि ती म्हणजे रश्मिकाने लग्नाच्या वेळी डोक्याला बांधलेली बारीक पिवळी पट्टी. तामिळ नवरीच्या डोक्यावर ही पट्टी असतेच. त्याला नेथी चुट्टी असं म्हणतात. रश्मिका मंदानानेही अशी नेथी चुट्टी घातली होती.
3 / 6
मराठी नवरी आणि नवरदेव कपाळावर मुंडावळ्या बांधतात. मुंडावळ्या कपाळाला दिसल्या की तोच नवरदेव किंवा नवरी आहे हे लगेच ओळखू येतं.
4 / 6
राजस्थानी नवरीच्या डोक्यावर बोरला असतो. लग्नात तर नवरी बोरला घालतेच, पण त्यानंतरही पारंपरिक कार्यक्रमांत किंवा सणावारांना बोरला घातलाच जातो.
5 / 6
बंगाली लग्न म्हटलं की मुकूट घातलेले नवरा- नवरी डोळ्यासमोर दिसू लागतात. आपल्याकडे जशा मुंडावळ्या असतात, तसेच तिथे नवरदेव- नवरीला मुकूट घालावेच लागतात.
6 / 6
काश्मिरी वधूच्या डोक्यावरही एक दागिना दिसतो. त्याला तरंग असं म्हणतात. काश्मिरी पंडीत नवरी हा दागिना घालते. आधी नवरीच्या डोक्यावर ओढणी ठेवली जाते आणि त्यावरून तिला तरंग घातले जाते.
टॅग्स : शुभविवाहफॅशनस्टायलिंग टिप्सरश्मिका मंदाना