Wedding Special: पायावर काढण्यासाठी झटपट, सोप्या- आकर्षक मेहेंदी डिझाईन्स, बघा एक से एक सुंदर प्रकार
Updated:November 21, 2022 16:21 IST2022-11-21T16:16:01+5:302022-11-21T16:21:27+5:30

१. काही वर्षांपुर्वी फक्त नवरीच पायावर मेहेंदी काढायची. पण आता मात्र नवरीची आई, तिच्या बहिणी, मैत्रिणी सगळ्याच जणी हौशीने पायावर मेहेंदी काढून घेतात. अर्थात नवरीप्रमाणे त्यांची मेहेंदी खूप भरगच्च नसते.
२. म्हणूनच जर पायावर एखादी सोपी, चटकन होणारी आणि अगदी नाजूक डिझाईनची मेहेंदी काढायची असेल, तर या बघा काही सोप्या डिझाईन्स.
३. हातावर जशी अरेबियन पद्धतीने डिझाईन काढतात, तशी आता पायावर देखील काढण्यात येते. एखाद्या वेलीप्रमाणे दिसणारी ही नक्षी पायांना निश्चितच आणखी शोभा आणते.
४. काही जणी फक्त पैंजण घातल्याप्रमाणे पायांवर डिझाईन काढतात. अशी पैंजण मेहेंदी सध्या भलतीच चर्चेत आहे.
५. अशा पद्धतीची डिझाईन भरगच्च वाटत असली तरी ती काढायला खूपच कमी वेळ लागतो. शिवाय डिझाईनही अगदी सोपं आहे. डिझाईन विरळ आहे, पण तरीही अगदी पाय भरून काढल्यासारखं वाटतं.
संपूर्ण पायाला मेहंदीची नाजूक नक्षी काढून बॉर्डर करणे आणि बोटावर अगदी थोडंसं डिझाईन काढणे अशा पद्धतीची फॅशनही हल्ली ट्रेंडिंग आहे.
हे त्यातलंच एक नाजूक डिझाईन. यामध्ये फक्त पायाच्या बोटांवर मेहेंदी काढली जाते. खूप मोठं डिझाईन आवडत नसेल, तर अशा पद्धतीची नक्षी तुम्हाला आवडू शकते.
८. पायावर खूप भरगच्च मेहेंदी आवडत नसेल, तर असं एखादं सुटसुटीत, सोपं डिझाईन काढू शकता.