लग्नात दिसाल ब्यूटी क्विन! मुरुम-पुरळ होईल गायब- ७ उपाय करा-लग्नातला ग्लो असेल खास
Updated:February 14, 2025 17:34 IST2025-02-14T17:25:03+5:302025-02-14T17:34:08+5:30
Beauty tips: 7 day beauty hacks: glowing skin tips : wedding skin care: 7 day beauty challenge: How can I get glowing skin: Beauty tips and tricks: skin care tips: skin care tips for glowing skin: wedding skin glow: wedding skin care routine : जर तुम्हालाही लग्नात सुंदर दिसायचं असेल तर आठवडाभर हे ७ उपाय करुन पाहा...

आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की, आपणही कोणत्या हिरोइनीपेक्षा कमी दिसायला नको. त्यामुळे वारंवार आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेत राहातो. (glowing skin tips )
सुंदर, निरोगी आणि तजेलदार त्वचा आपला आत्मविश्वास वाढवते. त्वचेवर सतत मुरुमे, पुरळे येत असतील तर आपण अनेक घरगुती उपाय करुन पाहातो. (wedding skin glow)
हळदी, तांदळाचे पाणी, कोरडफड जेल असो किंवा अजून काही. जर तुम्हालाही लग्नात सुंदर दिसायचे असेल, त्वचा काळवडली असेल तर हे ७ उपाय नक्की करुन पाहा (wedding skin care routine)
जर तुमची त्वचा तेलकट, कोरडी किंवा संवदेनशील असेल तर त्यानुसार उत्पादने निवडा. यामध्ये क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चयराझिंगचा समावेश करा.
चेहरा तजेलदार होण्यासाठी शरीर संपूर्णपणे आतून स्वच्छ व्हायला हवे. त्यासाठी भरपूर पाणी प्या. ग्रीन टी किंवा लिंबू पाण्याचा प्या. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल.
त्वचेला एक्सफोलिएट करा. ज्यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्याने त्वचेचा रंग सुधारतो. तसेच नैसर्गिक चमक मिळते. यानंतर मॉइश्चरायझर लावा.
चेहऱ्याला आवश्यक प्रमाणात पोषण मिळावं यासाठी मुलतानी माती, मध किंवा दुधाच्या फेस पॅकचा वापर करा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.
त्वचेसाठी आहारात देखील बदल करायला हवे. आपल्या रोजच्या खाण्यात संत्री, लिंबू किंवा व्हिटॅमिन सी सारखी फळे नियमित खा. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्सही खाऊ शकता.
चांगल्या आहारासोबत आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यायला हवी. रोज ७ ते ८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे डोळ्याखाली काळे वर्तुळ येतं नाही. झोपण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर लावा.
सतत जर ताण घेतला तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. ताण कमी करण्यासाठी योगासने, ध्यानधारणा किंवा श्वास घेण्याचे व्यायाम करा.