उन्हाळ्यात वॅक्सिंग करण्याचा प्रचंड त्रास होतो, आग होते? ५ टिप्स, रॅशेस-जळजळ होणार नाही
Updated:April 30, 2025 17:29 IST2025-04-30T17:23:52+5:302025-04-30T17:29:19+5:30
Waxing tips for summer: Prevent waxing burns: उन्हाळ्यात वॅक्सिंग करणार असाल तर या टिप्स लक्षात ठेवा.

हाता-पायाचे वॅक्सिंग करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करतो. परंतु, काही वेळा वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेचे नुकसान होते. (Avoid rashes after waxing)
उन्हाळ्यात वॅक्सिंग करताना आपल्याला प्रचंड त्रास होतो. हाता-पायाची आग होते. ज्यामुळे पायावर पुरळ येतात. जर उन्हाळ्यात आपण देखील वॅक्सिंग करणार असाल तर या टिप्स लक्षात ठेवा. (Safe summer waxing)
उन्हाळ्यात वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला एक्सफोलिएट करा. ज्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल. तसेच हाता-पायावरील फॉलिकल्स साफ होतील.
अनेकांची त्वचा कोरडी असते अशावेळी वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझ करु नका. वॅक्स करण्यापूर्वी आपण त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा इतर क्रीम लावली तर वॅक्स बरोबर सेट होत नाही. ज्यामुळे हाता-पायावरचे केस निघत नाहीत. (Waxing without irritation)
वॅक्स केल्यानंतर उन्हामध्ये जाऊ नका. घराबाहेर पडण्यापूर्वी आपले संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्या. अन्यथा त्वचा टॅन होईल.
वॅक्सिंग केल्यानंतर जास्त टाईट कपडे घालू नका. यानंतर वॅक्स केल्यानंतर त्वचा जास्त संवेदनशील होते. ज्यामुळे रॅशेस आणि जळजळ होण्याची शक्यता अधिक असते.
वॅक्स केल्यानंतर आपण हेवी वर्कआउट करत असू तर हाता-पायांना जळजळ होऊ शकते. त्यासाठी त्वचेवर रॅशेस-जळजळ होत असेल तर त्यावर बर्फ चोळा.