व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

Updated:August 12, 2025 18:53 IST2025-08-12T17:53:20+5:302025-08-12T18:53:26+5:30

Vitamin E Capsule Uses : Vitamin E For Skin & Hair : Vitamin E Home Remedies : व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूलची गोळी वापरण्याच्या ८ सोप्या पद्धती, सौंदर्यात पडेल भर...

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक आणि परिणामकारक उपायांपैकी (Vitamin E Capsule Uses) एक म्हणजे 'व्हिटॅमिन ई कॅप्सूल'. योग्य पद्धतीने वापरल्यास हे छोटेसे कॅप्सूल अनेक प्रॉब्लेम्स दूर करून तुमच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर घालतात.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

व्हिटॅमिन 'ई' हे त्वचेसाठी एक वरदान मानले जाते. या छोट्या कॅप्सूलमध्ये ( Vitamin E For Skin & Hair) असे अनेक गुणधर्म असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मुरुमांचे डाग असोत, कोरडी त्वचा असो, चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा केसांच्या अनेक समस्या व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या योग्य वापरामुळे या सर्व समस्या दूर होऊ शकतात.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल वापरण्याच्या ४ सोप्या आणि फायदेशीर (Vitamin E Home Remedies) पद्धती ज्यामुळे तुम्ही दिसाल अधिक सुंदर, नैसर्गिक सौंदर्यात पडेल भर...

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

दररोज रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल डोळ्यांखालील भागांवर लावून हलकेच बोटाने मसाज केल्यास डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांखालच्या त्वचेला पोषण देतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. त्यामुळे त्या भागातील डार्क सर्कल्स हळूहळू फिकट होतात आणि त्वचा टवटवीत दिसते.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूल ओठांचा कोरडेपणा आणि त्वचा फुटण्याची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यातील नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म ओठांना मऊ, गुळगुळीत आणि गुलाबी ठेवतात. रात्री झोपण्यापूर्वी कॅप्सूल फोडून त्यातील तेल स्वच्छ बोटांनी किंवा लिप ब्रशने ओठांवर लावा. हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि ओठांचा नैसर्गिक रंग खुलतो. हिवाळ्यात किंवा कोरड्या हवेत याचा नियमित वापर केल्यास ओठ फुटणे, सोलणे किंवा निस्तेजपणा या समस्यां कमी होतात.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूल फोडून त्यातील तेल कोमट खोबरेल तेलात मिसळा आणि स्काल्प तसेच केसांवर हलक्या हाताने मसाज करा. ३० ते ४५ मिनिटे तसेच ठेवून सौम्य शाम्पूने धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा हा उपाय केल्यास कोरडेपणा कमी होतो, स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते आणि केसांना नैसर्गिक सौंदर्य मिळते. व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूल केसांना आतून पोषण देऊन त्यांना मजबूत, मऊ आणि चमकदार बनवते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स स्काल्प मधील रक्ताभिसरण वाढवतात, केसगळती कमी करतात आणि नवीन केसांची वाढ मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत मिळते.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

त्वचेला मॉइश्चराईझ करणे अतिशय गरजेचे असते. यासाठी, एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल घेऊन त्यात व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल आणि तांदुळाचे पाणी घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव केल्यास उत्तम घरगुती मॉइश्चरायझर मिळते. हे घरगुती मॉइश्चरायझर त्वचेला खोलवरून पोषण देते, कोरडेपणा कमी करतो आणि नैसर्गिक ग्लो देतो.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

कोरडे आणि खडबडीत हात-पाय मऊ करण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूल बेस्ट ऑप्शन आहे. कॅप्सूल फोडून त्यातील तेल कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि हात-पायांवर मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी हातापायांच्या त्वचेसाठी वापरल्यास त्वचा मऊसर होऊन फुटण्याची समस्या कमी होते.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

प्रेग्नंन्सीनंतर किंवा वजन कमी-जास्त झाल्यावर आलेले स्ट्रेच मार्क्स हलके करण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ फायदेशीर ठरते. दररोज मार्क्सवर हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे मसाज केल्यास त्वचा टाईट होते आणि स्ट्रेच मार्क्सच्या खुणा हळूहळू कमी करण्यास मदत होते.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

कमकुवत, तुटणारी नखे आणि कोरड्या क्युटिकल्ससाठी व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल फोडून त्यातील तेल नखांवर आणि क्युटिकल्सवर लावा. यामुळे नखं मजबूत होतात आणि चमकदार दिसतात.

व्हिटॅमिन 'ई'ची हिरवीगार कॅप्सूल त्वचेपासून केसांपर्यंत अनेक समस्यांसाठी गुणकारी, पाहा ‘कशी’ वापरायची...

व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूलचे काही थेंब रोजच्या नाइट क्रीम किंवा फेस सिरममध्ये मिसळून लावल्यास त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि एजिंगच्या खुणा आणि बारीक सुरकुत्या कमी होतात.