1 / 7केस खूप पातळ झाले असतील, सारखे गळत असतील तर पुढे सांगितलेला उपाय करून पाहा.. 2 / 7हा उपाय सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सुचविला असून त्यांनी दाट आणि लांब केसांसाठी नियमितपणे ज्येष्ठमध वापरण्याचा सल्ला दिला आहे. 3 / 7ज्येष्ठमधामध्ये असे काही घटक असतात जे केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे ज्येष्ठमधाचं तेल वापरा असं ते सुचवितात.4 / 7घरच्याघरी ज्येष्ठमधाचं तेल तयार करणं सोपं आहे. यासाठी एका पातेल्यामध्ये १ कप खोबरेल तेल घ्या.5 / 7त्यामध्ये १ ते दिड चमचा ज्येष्ठमधाची पावडर घाला आणि ते तेल १० ते १२ मिनिटे उकळवून घ्या.6 / 7यानंतर तेल थंड होऊ द्या. गाळून घ्या आणि या तेलाने आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळाशी मालिश करा. त्यानंतर एखाद्या तासाने शाम्पू करून केस धुवून टाका. 7 / 7हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केस गळणं कमी होईल, केसांची चांगली वाढ होऊन ते दाट, लांब होण्यास मदत होईल असं जावेद हबीब सांगतात.