चेहऱ्यावर शिंपडा लवंगचं जादुई पाणी, हळूहळू त्वचेचं सौंदर्य खुलून चेहरा दिसेल फ्रेश, ग्लोईंग..
Updated:November 21, 2025 11:04 IST2025-11-21T10:56:19+5:302025-11-21T11:04:09+5:30

बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर बारीकसे काळपट डाग दिसत असतात. त्यालाच आपण पिगमेंटेशन असंही म्हणतो. काही जणींना ॲक्नेचा खूप त्रास असतो.
तर काही जणींच्या चेहऱ्यावर कमी वयातच बारीकशा सुरकुत्या दिसायला लागतात. चेहऱ्यावरचा ग्लो कमी होऊ लागतो. अशी कोणतीही समस्या असेल तर चेहऱ्यावर एका खास पद्धतीचं पाणी शिंपडा... बघा हळूहळू चेहऱ्याचं सौंदर्य कसं खुलत जातं..
हा उपाय करण्यासाठी ८ ते १० लवंग घ्या आणि त्या १ ग्लास पाण्यात घालून हे पाणी गॅसवर उकळायला ठेवा. जेव्हा पाणी उकळून त्याचा रंग बदलेल तेव्हा गॅस बंद करा. नंतर हे पाणी गाळून घ्या.
लवंगचं गाळून घेतलेलं पाणी थंड झाल्यानंतर त्यात २ चमचे कोरफडीचा गर घाला. त्वचा हायड्रेटेड ठेवून तिच्यावरचे डाग कमी करण्यासाठी ॲलोव्हेरा जेल उपयुक्त ठरतो.
यानंतर त्यामध्ये १ चमचा ग्लिसरीन घाला. त्वचा मॉईश्चराईज ठेवण्यासाठी ग्लिसरीन अतिशय उत्तम आहे. थंंडीच्या दिवसात तर त्वचेसाठी ग्लिसरीनचा वापर हमखास करायलाच हवा.
आता या मिश्रणामध्ये १ चमचा गुलाबजल घाला. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
यानंतर हा स्प्रे दिवसातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर मारा. काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहिल्यास त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.