1 / 9काही जणांचे डोक्याच्या समोरच्या भागातले म्हणजेच कपाळाच्या वरचे केस खूप जास्त गळतात. आणि त्यामुळे मग हेअरलाईन मागे- मागे जायला लागते.(how to control hair loss?)2 / 9डोक्याच्या समोरच्या भागात टक्कल पडल्यासारखं दिसतं. कपाळ खूपच मोठं वाटू लागतं..(home hacks for fast hair growth)3 / 9अशावेळी अगदी लवकर हा एक सोपा उपाय सुरू करा. जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा वापर करून घरच्याघरी लेप तयार करा आणि तो नियमितपणे केसांना लावा. काही दिवसांतच पुन्हा नवे केस उगवायला सुरुवात होईल, असं priyalakshisyummybites या इंस्टाग्राम पेजवर सुचविण्यात आलं आहे.(use of jaswand flower for reducing hair fall)4 / 9हा उपाय करण्यासाठी जास्वंदाची काही फुलं आणि काही पानं घ्या आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला.5 / 9त्यामध्ये १ चमचा कोरफडीचा ताजा गर घाला. केसांच्या वाढीसाठी कोरफड अतिशय उपयुक्त ठरते.6 / 9आता त्यामध्ये १ चमचा मेथी पावडर आणि १ चमचा कलौंजी पावडर घाला. या दोन्ही पावडर केसांच्या वाढीसाठी आणि केसांची मुळं पक्की करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 7 / 9आता हे सगळे पदार्थ मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या आणि त्यानंतर तो लेप केसांच्या मुळाशी लावा.8 / 9साधारण १ तासानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.9 / 9हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केसांची खूप छान वाढ झालेली दिसूून येईल.