Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

Updated:October 7, 2025 17:42 IST2025-10-07T14:21:29+5:302025-10-07T17:42:28+5:30

Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

दिवाळीपर्यंत चेहऱ्यावर छान ग्लो यायला हवा असेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने काही दिवस अगदी दररोज चेहऱ्याला ग्लिसरीन लावा. बघा तुमच्या त्वचेमध्ये किती छान फरक पडेल...(use of glycerine for glowing skin)

Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा ग्लिसरीन घ्या. ग्लिसरीन त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. त्वचेमधला ड्रायनेस कमी करून तिला छान मॉईश्चराईज ठेवण्यासाठी ग्लिसरीन उपयुक्त ठरतं (how to use glycerine for dull and dry skin?). कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर त्या घालविण्यासाठीही ग्लिसरीन उपयुक्त ठरते.(benefits of glycerine for skin care)

Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

यामध्ये आता १ चमचा खोबरेल तेल घाला. खोबरेल तेलामध्ये ल्युरीक ॲसिड असते. त्यामुळे त्वचेवरचे डाग, पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा नितळ, स्वच्छ होण्यास मदत होते.

Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

त्यामध्येच आपल्याला १ चमचा गुलाब जल घालायचे आहे. गुलाबजल तुमच्या त्वचेचे पीएच संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजेच गुलाबजलच्या नियमित वापरामुळे त्वचेमधलं ऑईल आणि पाणी दोन्हीही संतुलित राहाते. त्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स त्वचेवर येत नाहीत.

Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

आता सगळ्यात शेवटी या पदार्थांमध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. आता हे चारही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा.

Diwali 2025 : दिवाळीपर्यंत चेहऱ्याला रोज 'या' पद्धतीने ग्लिसरीन लावा, फेशियल न करताही चेहरा मस्त चमकेल

दररोज सकाळी चेहरा धुतल्यानंतर तसेच रात्री झोपण्यापुर्वी हे घरगुती सिरम त्वचेला लावा. काही दिवसांतच त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.