चेहऱ्यावर वांगाचे डाग? खोबरेल तेलात २ पदार्थ मिसळून लावा- पिगमेंटेशन जाऊन त्वचा चमकेल
Updated:May 6, 2025 18:45 IST2025-05-06T18:38:52+5:302025-05-06T18:45:40+5:30

साधारण तिशीनंतर बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर बारीक बारीक पिगमेंटेशन दिसू लागतं. त्यावर वेळीच उपाय नाही केला तर ते वाढत जातं आणि संपूर्ण चेहराच खराब होऊन जातो.(use of coconut oil for reducing pigmentation)
शिवाय काही जणींना पिंपल्स येण्याचा त्रास असतो. पिंपल्स ३- ४ दिवसांत त्वचेवरून जातात (best home remedies for glowing skin). पण त्यानंतर त्यांचे डाग मात्र त्वचेवर महिनोंमहिने तसेच राहतात..
असे वांगाचे डाग, पिगमेंटेशन किंवा पिंपल्सचे डाग काढून टाकायचे असतील तर त्यासाठी हा एक सगळ्यात सोपा आणि अतिशय स्वस्त उपाय पाहा.. हा उपाय Rohit Sachdeva या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये १ टीस्पून कॉफी पावडर घाला. कॉफी पावडर एखाद्या नॅचरल स्क्रबरप्रमाणे तुमच्या त्वचेसाठी काम करते. त्यामुळे डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघून जातात.(how to get rid of blackheads and white heads?)
यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस जर तुमच्या त्वचेला सहन होत नसेल तर त्यामध्ये टोमॅटोचा रस घाला. यामुळे चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, टॅनिंग कमी होऊन स्किन टोन सुधारण्यास मदत होते.
आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि साधारण १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
आठवड्यातून ३ वेळा हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.