लवंग घेऊन 'या' पद्धतीने तयार केलेलं पाणी वापरा- केस वाढतील दुपटीने, त्वचाही होईल नितळ
Updated:October 4, 2025 09:40 IST2025-10-04T09:37:33+5:302025-10-04T09:40:02+5:30

सर्दी, खोकला, कफ असा त्रास कमी करण्यासाठी लवंग अतिशय उपयुक्त ठरते हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यासोबतच केस आणि त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठीही लवंग फायदेशीर ठरते.
लवंग वापरून एका खास पद्धतीने पाणी तयार केलं आणि ते केसांसाठी वापरलं तर केस चांगले वाढतात असं ब्यूटी एक्सपर्ट सांगत आहेत.
यासाठी १ ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये उकळत ठेवा. त्या पाण्यामध्ये १ टेबलस्पून लवंग टाका. हे पाणी १० ते १५ मिनिटे उकळत ठेवा. त्यानंतर हे पाणी थंड झालं की स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
आता या पाण्यामध्ये १ टेबलस्पून रोज वॉटर, १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल आणि ४ ते ५ थेंब टी ट्री इसेंशियल ऑईल घाला.
स्प्रे बॉटल व्यवस्थित हलवून तिच्यातलं पाणी दिवसातून २ ते ३ वेळा चेहऱ्यावर मारा. लवंगसह इतर जे घटक या पाण्यामध्ये असतात त्या सगळ्यांच्या एकत्रित गुणांमुळे चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा नितळ होते.
तसेच रात्री झोपण्यापुर्वी हा स्प्रे केसांच्या मुळाशी मारा. हे पाणी केसांसाठीही अतिशय फायदेशीर ठरतं. यामुळे केस गळणं कमी होऊन त्यांची जलद वाढ होते.