फक्त १ चमचा बेसन रोज 'या' पद्धतीने वापरा- महागड्या फेसवॉश, फेसपॅकची गरजच नाही
Updated:May 21, 2025 09:35 IST2025-05-21T09:28:16+5:302025-05-21T09:35:01+5:30

त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे कित्येक पदार्थ आपल्या स्वयंपाक घरातच असतात. पण तरीही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि इतर महागडे फेसपॅक, साबण, फेसवॉश शोधत बसतो..
अशा पदार्थांपैकी एक म्हणजे बेसन. आपल्याकडे फार पुर्वीपासून बेसनाचा उपयोग सौंदर्य खुलविण्यासाठी केला जातो. पण आता मात्र आपण तो थोडासा विसरत चाललो आहोत.
म्हणूनच आता त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर छान चमक येण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने बेसन वापरायचं ते पाहूया..
एक चमचा बेसन, १ टीस्पून हळद एकत्र करून कच्च्या दुधामध्ये कालवून घ्या. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्यावर छान चमक येईल तसेच त्वचा अतिशय मऊ होईल.
चेहऱ्यावर किंवा शरीरावर कुठेही टॅनिंग झालं असेल तर बेसन आणि दही हे दोन पदार्थ एकत्र करून लावा. १० ते १२ मिनिटांनी हळुवार हाताने मसाज करत चेहरा धुवा. टॅनिंग निघून जाईल.
त्वचा खूप तेलकट असेल तर बेसन पीठ आणि गुलाब जल यांचा लेप चेहऱ्यावर आठवड्यातून ३ वेळा लावावा. यामुळे तेलकटपणा कमी होऊन त्वचा टाईट होण्यासही मदत होते.
बेसन आणि टोमॅटोचा रस एकत्र करून चेहऱ्यावर जिथे पिंपल्स असतील तिथे लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा. पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.
बटाट्याचा रस आणि बेसन एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास पिगमेंटेशन, वांगाचे डाग कमी होऊन त्वचेचा रंग एकसारखा होण्यास मदत होते.