1 / 6बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. वयाच्या ५१ व्या वर्षीही ट्विंकल खन्नाचे केस जाड आणि काळेभोर आहेत. तिचे केस आजही अनेकांना आवडतात. ती म्हणते सलूनमध्ये जाऊन केस सुंदर आणि चमकदार दिसत नाही. त्याची काळजी लहानपणापासूनच घ्यावी लागते. (Twinkle Khanna hair care)2 / 6ट्विंकला खन्ना म्हणते मी केसांसाठी महागडे सिरम किंवा स्पा करत नाही. केसांच्या सौंदर्यासाठी काही घरगुती उपाय करते. जे माझ्या आईने मला सांगितले आहे. जाणून घेऊया तिचं ब्यूटी सिक्रेट. (Twinkle Khanna beauty secrets)3 / 6ट्विंकल खन्ना तिच्या टाळूला फ्रीज म्हणते. कारण ती तिच्या केसांसाठी जे काही घरगुती उपाय करते ते फ्रीजमधून येतात बिअर, अंडी आणि दही याचा समावेश आहे. 4 / 6चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तिने केसांना बिअर लावली होती. ज्यामुळे तिचे केस चमकदार झाले होते. बिअरमधील हॉप्स आणि बार्ली हे केसांसाठी टॉनिक म्हणून काम करतात. यात असणारे जीवनसत्त्व केसांना पोषण देतात, टाळूला हायड्रेट करतात. 5 / 6कांद्याचा रस देखील आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. यासाठी ती कांद्याचा ताजा रस काढून टाळूवर हलक्या हाताने मालिश करते. २० मिनिटानंतर केस धुते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. कांद्याच्या रसात असणारा सल्फर रक्त प्रवाह सुधारतो आणि टाळूला पोषण देतो. 6 / 6दही आणि अंड्याचा हेअर मास्क केसांसाठी चांगला आहे. यामुळे कोरडे केस मऊ होतात. दह्यातील लॅक्टिक अॅसिड टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात. बॅक्टेरियाच्या संसर्गात प्रतिबंध करतात. अंड्याच्या आत असणारा पिवळा भाग केसांसाठी बायोटिनचा नैसर्गिक स्त्रोत मानला जातो.