Join us

सणासुदीला घाला १० प्रकारचे पारंपरिक दागिने! काठाच्या-खणाच्या साडीवर शोभून दिसेल,अस्सल मराठमोळा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 17:27 IST

1 / 10
लग्न सोहळा किंवा सणाच्या दिवशी महत्त्वाचा भाग असतो ते दागिने. महाराष्ट्रात प्रत्येक वेगवेगळ्या भागानुसार दागिन्याचे प्रकार बदलतात. (Traditional Maharashtrian Jewelry for Brides)
2 / 10
काठाच्या आणि खणाच्या साडीवर कोणते पारंपरिक दागिने घालायला हवे जाणून घेऊया. (Maharashtrian Bridal Look)
3 / 10
ठुशी हा गळ्यात घातला जाणारा प्रकार आहे. ही बारीक मण्यामध्ये गुंफलेली असते. तसेच मोरणी ठुशी, मोहनमाळ ठुशी असे देखील प्रकार आहेत. काठाची किंवा खणाच्या साडीवर शोभून दिसते.
4 / 10
चंदनहारला थोडीशी जाळीसारखी डिजाईन केलेली असते. हा हार दिसायला सुंदर आणि ट्रेंडी असतो. कोणत्याही साडीवर हा परफेक्ट बसतो.
5 / 10
अनेक महिलांचा आवडता दागिना शाहीहार. लेयर्समध्ये असलेला हा हार अनेक साड्यांवर शोभून दिसतो. इंडोवेस्टर्न ड्रेसवर देखील याला स्टाईल करता येते.
6 / 10
सध्या सगळ्यात फॉर्ममध्ये असलेला दागिन्यांचा प्रकार म्हणजे टेंपल ज्वेलरी. ही ज्वेलरी दिसायला सुंदर असते. यामध्ये लक्ष्मी आणि सरस्वतीचे गुंफन केले जाते.
7 / 10
मराठमोळ्या दागिन्यांमध्ये राणीहार देखील अतिशय सुंदर दागिना आहे. राणी हार हा सगळ्या हारांची शान मानला जातो. यामुळे आपला गळा भरलेला दिसतो.
8 / 10
चिंचपेटी ही ठुशीसारखीच असते पण हा दागिना मोत्यामध्ये गुंफला जातो. हा पारंपारिक दागिना म्हणून ओळखला जातो.
9 / 10
महाराष्ट्रीयन दागिन्यांमधील आणखी एक प्रकार बोरमाळ. यामध्ये लहान बोराच्या आकाराचे मणी जोडलेले असतात म्हणून याला बोरमाळ असे म्हटले जाते.
10 / 10
अत्यंत पारंपरिक आणि अनेकांच्या आवडीचा दागिना पुतळी हार. हा हार दोऱ्यामध्ये ओवला जातो. गळ्यालगत आणि मोठा असे यात दोन प्रकार असतात.
टॅग्स : फॅशनदागिने