कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

Updated:February 11, 2025 10:41 IST2025-02-11T10:29:00+5:302025-02-11T10:41:44+5:30

Tips & Tricks Avoid These 6 Mistakes In Korean Skincare For Flawless Skin : Know Koreans Secret For Getting Glass Skin : 6 common mistakes to avoid in your Korean beauty routine : कोरियन तरुणींची स्किन कायम असते सॉफ्ट ॲण्ड ग्लोईंग, त्या करत नाहीत या ६ चुका...

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

कोरियन ब्यूटी ट्रेंड सध्या भारतासह संपूर्ण जगभरात फॉलो केले जातात. आपल्यापैकी प्रत्येकजण कोरियन ब्यूटी ट्रेंडच्या फारच प्रेमात आहे. अनेक तरूणी साधे सोपे असणाऱ्या पण त्वचेवर अतिशय प्रभावी ठरणारे कोरियन उपाय नक्की (Tips & Tricks Avoid These 6 Mistakes In Korean Skincare For Flawless Skin) फॉलो करुन पाहाताच.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

कोरियन स्किनकेअर रुटीनमध्ये ते आपल्या त्वचेची विशेष काळजी (6 common mistakes to avoid in your Korean beauty routine) घेताना दिसतात. याचबरोबर, आपल्या त्वेचेची काळजी घेणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी त्वचेसंबंधित चुका टाळणे देखील गरजेचे आहे, असे ते मानतात. त्वचेची काळजी घेताना आपण काही चुका करतो ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. परंतु कोरियन तरुणी आपल्या स्किनची काळजी घेताना या चुका करत नाहीत, ज्यामुळे त्यांची त्वचा अगदी तुकतुकीत, तलम आणि चमकदार दिसते. या चुका कोणत्या ते पाहूयात.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

स्क्रबिंग केल्याने त्वेचेतील मृत पेशी काढल्या जाऊन त्वचा स्वच्छ होते. परंतु जास्त स्क्रबिंग केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते. यामुळे त्वचा कोरडी आणि खरखरीत होऊ शकते. स्क्रबिंग आठवड्यातून फक्त १ ते २ वेळाच करावे आणि ते नेहमी हलक्या हातांनी करावे.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेची छिद्र उघडी पडू शकतात. याचबरोबर खूप गरम पाणी त्वचेतील ओलावा काढून टाकते. यामुळे त्वचा कोरडी आणि रखरखीत होते. त्वचा हायड्रेट राहावी म्हणून त्वचेसाठी नेहमी कोमट पाण्याचाच वापर करावा.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

चेहऱ्याची त्वचा, विशेषतः डोळ्यांभोवतीची त्वचा, खूपच नाजूक असते. जेव्हा आपण जास्त दाब देऊन क्रीम किंवा सीरम लावले तर त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या येऊ शकतात. यासाठी त्वचेची काळजी घेणारे ब्यूटी प्रॉडक्ट्स हलक्या हाताने त्वचेवर लावावीत जेणेकरून ती योग्यरित्या शोषली जातील.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

जर तुम्ही उन्हात बाहेर जात असाल आणि सनस्क्रीन लावले नसले तर त्यामुळे तुमच्या त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. घरात असतानाही, अतिनील किरणे तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. यासाठी दररोज SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

जर तुम्ही रात्री मेकअप न काढता झोपलात तर तुमच्या त्वचेची छिद्र बंद होऊ शकतात. ज्यामुळे मुरुमे आणि त्वचा निस्तेज होऊ शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे, जेणेकरून त्वचा रात्रभर मोकळा श्वास घेऊन रिपेअर होऊन शकेल.

कोरियन तरुणी कधीच करत नाहीत 'या' ६ चुका, म्हणून त्यांची त्वचा चमकते! आणि तुमची...

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, म्हणून तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य उत्पादने निवडणे महत्त्वाचे आहे. तेलकट त्वचा असलेल्यांनी हलके आणि वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स वापरावेत, तर कोरडी त्वचा असलेल्यांनी हायड्रेटिंग क्रीम्स निवडावी. विचार न करता अनेक नवीन उत्पादने वापरल्याने त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.