आयब्रो, अप्पर लिप्स केल्यावर त्वचेची आग, रॅशेज येतात? ५ पदार्थ - जळजळ बंद होऊन मिळेल आराम...
Updated:August 29, 2025 11:54 IST2025-08-29T07:00:00+5:302025-08-29T11:54:01+5:30
Tips & Tricks 5 Easy Ways To Reduce Skin Irritation & Redness After Threading : reduce skin irritation after threading : how to reduce redness after threading : tips for skin care after threading : home remedies for threading irritation : how to soothe skin after threading : आयब्रो, अप्पर लिप्स केल्यावर त्वचेची होणारी जळजळ, खाज किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी उपाय...

आयब्रो केल्यानंतर त्वचेची जळजळ, तो भाग हलकासा लालसर (how to soothe skin after threading) होणे या फारच कॉमन समस्या आहेत. त्वचेवर थेट थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग केल्याचा ताण आल्यामुळे हा त्रास होतोच. त्वचेवरील ही जळजळ, वेदना कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरु शकतील.
आयब्रो केल्यानंतर होणारी त्वचेची जळजळ किंवा रॅशेज व (Tips & Tricks 5 Easy Ways To Reduce Skin Irritation & Redness After Threading) लालसरपणा कमी करण्यासाठी काहीवेळा केमिकल्सयुक्त क्रीम्स, लोशन हानिकारक ठरु शकते. यातही त्वचा जर अधिक सेंसेटिव्ह असेल तर अशावेळी नैसर्गिक उपायांचा वापर करणेच उत्तम ठरते.
आयब्रो केल्यावर त्वचेची होणारी जळजळ, खाज किंवा (reduce skin irritation after threading) लालसरपणा कमी करण्यासाठी उपाय म्हणून बर्फाचा वापर करतात, पण तो थेट त्वचेवर लावल्याने नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, घरात असलेल्या काही साध्या गोष्टी तात्काळ थंडावा देऊन आराम देऊ शकतात.
१. दूध :-
थ्रेडिंग केल्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी थंड दुधाचा वापर केला जाऊ शकतो. दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड जळजळ कमी करते आणि त्वचेला मऊमुलायम करते. जर त्वचा सेंसेटिव्ह असेल तर थंड दुधाचा वापर करणे फायदेशीर ठरु शकते.
२. काकडी :-
फ्रिजमधून काढलेले थंडगार काकडीचे काप त्वचेवर ठेवल्याने तात्काळ आराम मिळतो. काकडीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन 'सी' आणि जास्त पाण्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि लालसरपणा हळूहळू कमी होतो.
३. दही :-
दुधाप्रमाणेच त्वचेला दही लावणे देखील अधिक फायदेशीर ठरु शकते. आयब्रो थ्रेडिंगनंतर होणारी जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर ठरु शकतो. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि थंडावा देणारे गुणधर्म त्वचेला त्वरित आराम देतात.
४. गुलाबपाणी :-
गुलाबपाणी त्याच्या थंडावा देणाऱ्या आणि दाह कमी करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते. आयब्रो किंवा अप्पर लिप्स थ्रेडिंगनंतर कापसावर गुलाबपाणी घेऊन ते त्वचेवर हळूवारपणे लावा. यामुळे त्वचेला ताजेपणा आणि आराम मिळेल.
५. एलोवेरा जेल :-
एलोवेरा जेल एक नैसर्गिक औषध मानले जाते. थ्रेडिंगनंतर जर त्वचेवर लालसरपणा दिसत असेल, तर फ्रिजमध्ये ठेवलेले थंडगार एलोवेरा जेल त्वचेवर लावा. यामुळे जळजळ, लालसरपणा कमी होऊन त्वचा मऊमुलायम देखील होईल.