किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

Updated:April 1, 2026 18:26 IST2026-03-31T19:00:15+5:302026-04-01T18:26:58+5:30

thicker eyebrows naturally at home : eyebrow growth tips using castor oil : भुवया होतील दाट आणि रेखीव, 'या' ५ तेलांचा जादूई वापर ठरेल असरदार...

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यात आपल्या डोळ्यांइतकाच महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे भुवयांचा...दाट आणि काळ्याभोर भुवयांमुळे चेहऱ्याचा लूक अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतो. पण अनेकजणींना भुवया पातळ असणे, केस न वाढणे किंवा विरळ (thicker eyebrows naturally at home) दिसणे अशा समस्या सतावतात... मग त्या दाट आणि आकर्षक दिसण्यासाठी आपल्याला दरवेळी आयब्रो पेन्सिल किंवा महागड्या ट्रीटमेंट कराव्या लागतात.

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

भुवयांचे केस दाट, काळेभोर व भरीव दिसण्यासाठी घरगुती उपायांमध्ये पारंपरिक, औषधी एरंडेल तेल अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले पोषक घटक आयब्रोच्या केसांची वाढ सुधारण्यास, त्यांना दाट आणि मजबूत करण्यास मदत करतात.

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

एरंडेल तेलाचा योग्य आणि परिणामकारक वापर कसा करावा, तसेच भुवया दाट, काळ्याभोर आणि आकर्षक दिसण्यासाठी कोणकोणते सोपे उपाय करता येतात ते पाहूयात...

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

रोझमेरी ऑईल हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे तेल आयब्रोच्या 'फॉलिकल्स'पर्यंत (मुळांपर्यंत) पोहाचून रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे भुवयांचे केस वेगाने आणि दाट वाढण्यास मदत होते. एका छोट्या वाटीत १ मोठा चमचा एरंडेल तेल घ्या. त्यामध्ये रोझमेरी ऑईलचे फक्त ३ थेंब टाका. हे मिश्रण नीट मिसळून थोडे पातळ करून घ्या. आता एका 'इअर बड' किंवा बोटाच्या मदतीने हे मिश्रण तुमच्या आयब्रोवर लावा. हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. भुवयांचे केस केवळ दाटच होणार नाहीत, तर ते नैसर्गिकरित्या काळेभोर आणि चमकदारही दिसू लागतील.

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

खोबरेल तेल हे केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. यामध्ये 'लॉरिक ॲसिड' असते, जे केसांमधील प्रोटीनला मजबूत बनवण्याचे काम करते. तसेच, खोबरेल तेल भुवयांच्या भागाला खोलवर ओलावा देते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते. समप्रमाणात नारळ तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण थोडे कोमट केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. एका कापसाच्या बोळ्याने किंवा बोटाने हे तेल भुवयांवर नीट लावा. ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून तेल मुळांपर्यंत जाईल. हे मिश्रण दररोज रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास चांगला परिणाम दिसतो. हे मिश्रण अतिशय हलके असते आणि त्वचेत लवकर शोषले जाते. यामुळे भुवयांचे केस तुटणे थांबते आणि ते दाट होण्यास मदत होते.

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

बदाम तेल हे व्हिटॅमिन E, A आणि B ने परिपूर्ण असते, जे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. हे तेल आयब्रोच्या केसांचे तुटणे कमी करते आणि त्यांना मुळापासून मजबूत व दाट बनवते. बदाम आणि एरंडेल तेलाचे हे मिश्रण केसांच्या जलद वाढीसाठी अतिशय फायदेशीर ठरते. अर्धा चमचा बदाम तेल आणि अर्धा चमचा एरंडेल तेल एका वाटीत एकत्र करून घ्या. हे मिश्रण थोडे कोमट करून लावल्यास ते त्वचेच्या छिद्रांमध्ये खोलवर जाते. रात्री झोपण्यापूर्वी आयब्रोवर हे तेल लावून २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. रात्रभर हे तेल तसेच राहू द्या आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. ज्यांच्या आयब्रोचे केस खूपच विरळ आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो.

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

जोजोबा ऑईल हे आपल्या त्वचेतून निघणाऱ्या नैसर्गिक तेलासारखेच असते. हे तेल आयब्रोच्या भागातील त्वचेच्या बंद झालेल्या छिद्रांना आणि केसांच्या मुळांना उघडण्यास मदत करते. जेव्हा जोजोबा ऑईल एरंडेल तेलासोबत मिसळून लावले जाते, तेव्हा ते आयब्रोच्या केसांची वाढ वेगाने करण्यास आणि त्यांना अधिक दाट बनवण्यास मदत करते. एक छोटा चमचा जोजोबा तेल आणि एक छोटा चमचा एरंडेल तेल नीट एकत्र करा. हे मिश्रण हातावर घेऊन हलके चोळून गरम करा. आता आयब्रोवर हे तेल लावून बोटांच्या टोकाने २ ते ३ मिनिटे गोलाकार मसाज करा. रात्रभर हे तेल तसेच राहू द्या, जेणेकरून ते खोलवर शोषले जाईल.

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला...

व्हिटॅमिन 'ई' हे एक शक्तिशाली 'अँटी - ऑक्सिडंट' म्हणून ओळखले जाते. हे तेल आयब्रोच्या खराब झालेल्या केसांच्या मुळांची दुरुस्ती करते आणि त्या भागातील रक्ताभिसरण त्वरित सुधारते. जेव्हा व्हिटॅमिन 'ई' हे एरंडेल तेलासोबत मिसळून लावले जाते, तेव्हा ते भुवयांच्या त्या दाट बनवते जिथे केस खूप कमी किंवा विरळ आहेत. हे एक शक्तिशाली 'अँटी-ऑक्सिडंट' म्हणून ओळखले जाते. हे तेल आयब्रोच्या खराब झालेल्या केसांच्या मुळांची दुरुस्ती करते आणि त्या भागातील रक्ताभिसरण त्वरित सुधारते. जेव्हा व्हिटॅमिन 'ई' हे एरंडेल तेलासोबत मिसळून लावले जाते, तेव्हा ते भुवयांच्या केसांना दाट, काळेभोर बनवते. एक व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल फोडून त्यातील तेल एका वाटीत काढा. त्यामध्ये एक छोटा चमचा एरंडेल तेल मिसळा. हे मिश्रण नीट एकजीव करा. बोटाच्या टोकाने किंवा 'मसकारा ब्रश'च्या मदतीने हे तेल आयब्रोवर नीट लावा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास आणि रात्रभर हे तेल तसेच ठेवल्यास चांगला फरक दिसतो.