२०२५ चा सगळ्यात हॉट ट्रेंड- सोप नेल्स! फॅशन स्टेटमेंटचा पाहा नवाकोरा स्टायलिश फंडा
Updated:February 17, 2025 15:20 IST2025-02-17T15:10:48+5:302025-02-17T15:20:16+5:30
The hottest trend of 2025 - Soap Nails! Check out the latest nail art : तुम्ही अजून सोप नेल्स करुन घेतलेत की नाही ?

सध्या एक नखांशी संबंधित ट्रेंड सुरू आहे. अशी नखे जी सगळ्यांच्याच हातावर सुंदर दिसतील.
या मॅनिक्युअर स्टाईलला सोप नेल्स असे म्हणतात. नखांना स्वच्छ करून त्यांना आकार दिला जातो.
या प्रकारात नखांना चमकदार, स्वच्छ आणि पॉलिश केले जाते. त्यांना ग्लॉसी केले जाते. हलक्या लाईट रंगांचे नेल पॉलिश त्या नखांवर लावले जाते.
नेल पॉलिशचे दोन थर लावले जातात. तुमच्या आवडीनुसार रंग तुम्ही सांगू शकता. गुलाबी, न्युड, पांढरा असे रंग यात वापरले जातात.
नॅचरल, सुंदर व साध्या अशा लुकसाठी नखांवर सोप नेल मॅनिक्युअर केले जाते. दिसायला ते फार क्लासी दिसते.
आलिया भटपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत अनेक अभिनेत्रींनी सोप नेलचा ट्रेंड फॉलो केला आहे.
नेलआर्ट म्हटलं की, डिझाईनच डोळ्यासमोर येतं. त्यामुळे अनेक जण नेल आर्ट करत नाहीत. सगळ्यांनाच नखांवर डिझाईन आवडतात असं नाही.
ज्यांना डिझाईन आवडत नाही, अशांसाठीच हा नेलआर्टचा प्रकार शोधलेला आहे. यात फक्त साधा रंग पॉलिश करून नखाला लावला जातो.
सेलेना गोमेझने सोप नेल्सचा फोटो टाकल्यावर त्याला जास्त हाईप मिळाली आहे. टॉम बॅचिंक या नेल आर्टिस्टमुळे सोप नेल्सना प्रसिद्धी मिळाली आहे.