1 / 7गळून गळून केस खूप पातळ झाले असतील तर तुमच्या आहारातील मायक्रोन्युट्रियंट्सची कमतरता हे त्यामागचं एक कारण असू शकतं. म्हणूनच काही पदार्थ नियमितपणे खाल्ले तर केस गळणं नक्कीच बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं.(superfood for hair)2 / 7त्यासाठी कोणते पदार्थ आवर्जून खायला पाहिजेत, याविषयी माहिती देणारा व्हिडीओ आहारतज्ज्ञांनी dietitian.dnyanada या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.(best food for fast hair growth)3 / 7शरीरात प्रोटिन्सची कमतरता असणं हे केस गळण्याचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात प्रोटीन्स खात आहात की नाही ते एकदा तपासून पाहा. यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांकडूनही तुम्ही याेग्य तो सल्ला घेऊ शकता.(food that helps to control hair fall or hair loss)4 / 7शरीरात लोहाची कमतरता असणं हे देखील केस गळण्याचं एक कारण आहे. त्यामुळे लोहयुक्त पदार्थ आहारात योग्य प्रमाणात असू द्या.5 / 7जवस, कारळं, तीळ, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया भाजून घ्या आणि एकत्र करा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा एकेक चमचा खा. यातूनही केसांना छान पोषण मिळेल.6 / 7सुकामेवा खाण्यावरही भर द्या. ५ बदाम, २ अक्रोड, २ खजूर, मनुका हे काही दिवस अगदी नियमितपणे खाऊन पाहा. यामुळेही केस गळण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं.7 / 7केसांसाठी बायोटीन हा घटक महत्त्वाचा असतो. तो मिळविण्यासाठी रताळे आणि मशरूम नियमितपणे खावेत. हे सगळे पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास केसांवर नक्कीच चांगला परिणाम दिसून येऊ शकतो, असं आहारतज्ज्ञ सांगतात.