रात्री खूप थकल्यामुळे स्किन केअरसाठी वेळच नसतो? सोनाक्षी सिन्हा सांगते चमकदार त्वचेसाठी सोपी ट्रिक
Updated:May 28, 2025 15:25 IST2025-05-28T15:16:02+5:302025-05-28T15:25:33+5:30

ज्यांना रात्रीच्या स्किनकेअर रुटीनसाठी अजिबातच वेळ नसतो, त्यांच्यासाठी सोनाक्षी सिन्हा एक खास गोष्ट सांगते आहे..(Sonakshi Sinha reveals her 'lazy girl' night skincare routine)
बहुतांश महिलांच्या मागे घरातली, ऑफिसची एवढी कामं असतात की त्वचेची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतोच..
त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी रात्रीसाठीही खास स्किन केअर रुटीन असायला हवं असं तज्ज्ञ नेहमी सांगतात. पण घरातली सगळी कामं आवरल्यानंतर कधी एकदा अंथरुणाला पाठ टेकवते, असं अनेकींना होऊन जातं. त्यात त्वचेचे लाड करण्याएवढी ताकदही त्यांच्यात उरलेली नसते.
म्हणूनच अशा सगळ्या महिलांसाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एक खास गोष्ट सांगते आहे. अगदी कमीतकमी वेळेत तुम्ही या पद्धतीने त्वचेची काळजी घेऊ शकता.
याविषयीचा जो व्हिडिओ सोनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे त्यामध्ये तिने सगळ्यात आधी तिचा चेहरा स्वच्छ पुसून घेतला. तुम्ही पाणी लावून चेहरा स्वच्छ धुवून घेऊ शकता.
आता बदामाचं तेल किंवा जोजाबा ऑईल घ्या आणि त्वचेला छान मसाज करा.
तुम्ही यासाठी ॲलोव्हेरा जेलही वापरू शकता. कपाळ, गाल, नाक, जॉ लाईन अशा सगळ्या भागांनाच व्यवस्थित मसाज केल्यानंतर कानाच्या आजुबाजुलाही मसाज करा.
अगदी एका मिनीटाचा हा उपाय आहे. पण जर तो तुम्ही नियमितपणे केला तर त्वचेवर अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी होऊन त्वचेवर छान ग्लो येईल. चेहऱ्यावरील सूज कमी होऊन त्वचा रेखीव होईल असं सोनाक्षी सांगते.