उन्हाळा की पावसाळा, बदलत्या हवेने त्वचा निस्तेज-कोरडी पडली? १ सोपा उपाय-चेहरा चमकेल रोज
Updated:May 16, 2025 19:05 IST2025-05-16T19:00:00+5:302025-05-16T19:05:01+5:30
Dull and dry skin remedies: Home remedies for glowing skin: Raw milk for face glow: आपण घरगुती उपाय केल्यास त्वचेच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल.

सध्या वातावरणातील बदलामुळे आरोग्यासोबत त्वचेचे देखील नुकसान होत आहे. यामुळे त्वचा टॅन होण्यासोबतच अधिक कोरडी आणि ड्राय होते आहे. (Dull and dry skin remedies)
ऊन-पावसाच्या खेळामुळे त्वचा टॅन होणे, तेलकट होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी महागड्या उत्पादनांचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. (Home remedies for glowing skin)
अशावेळी महागडे उत्पादने वापरण्याऐवजी आपण घरगुती उपाय केल्यास त्वचेच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल.
आपली त्वचा खूप नाजूक असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा त्याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कच्चे दूध लावा. यामुळे त्वचेचा रंग सुधारेल.
त्वचा कोरडी आणि निस्तेज होत असेल तर नियमितपणे कच्चे दूध लावा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करेल. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या मदतीने कच्चे दूध लावा. यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होईल.
कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग, बारीक रेषा किंवा वृद्धत्वाची लक्षणे जाणवत असतील तर नियमितपणे चेहऱ्यावर कच्चे दूध लावायला हवे.
वातावरणातील बदलामुळे अनेकदा चेहऱ्यावर पुरळ, उष्माघात, फोड यांसारख्या समस्या दिसून येतात. यामुळे चेहऱ्यावर रॅशेस आणि ऍलर्जीची समस्या वाढते. अशावेळी कच्चे दूध लावल्यास आराम मिळतो.