1 / 8केस खूप गळायला लागले असतील आणि केसांवरची चमक कमी झाली असेल तर महिनाभर हा एक उपाय नियमितपणे करून पाहा.2 / 8हा उपाय केल्यामुळे केसांची वाढ जास्त चांगली होईल. तसेच केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल.3 / 8हा उपाय करण्यासाठी अर्धा चमचा जवस घ्या. जवस केसांवर चमक आणतात आणि केस कोरडे, सिल्की होण्यास मदत करतात.4 / 8त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे घ्या. केसांची मुळं पक्की होण्यासाठी मेथी दाणे उपयुक्त ठरतात.5 / 8आता यामध्येच अर्धा चमचा कलौंजी आणि ८ ते १० कडिपत्त्याची पाने घ्या. हे सगळे पदार्थ अर्धा ग्लास पाण्यात गरम करायला ठेवा.6 / 8पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये रोजमेरी घाला. रोजमेरी नसेल तरी चालेल. 7 / 8आता हे पाणी ५ ते ७ मिनिटे उकळून घेतल्यानंतर गाळून घ्या. त्यानंतर ते तुमच्या नेहमीच्या शाम्पूमध्ये घाला आणि या पाण्याने केस धुवा.8 / 8हा उपाय आठवड्यातून एकदा करा. महिना भरातच केसांमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येईल.