दहीदुधाचा वापर करून बघा कशी घ्यायची त्वचेची काळजी! ग्लोईंग त्वचेसाठी स्वस्तात मस्त ट्रिक्स..
Updated:April 12, 2025 13:46 IST2025-04-12T13:42:12+5:302025-04-12T13:46:39+5:30

उन्हाळ्यात त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्वचा चिपचिपित होते, टॅनिंग खूप जास्त होतं. हे सगळं कमी करण्यासाठी कोणतेही महागडे फेसपॅक वापरण्याची गरज नसते.
काही घरगुती उपायही तुमच्या त्वचेची खूप चांगली काळजी घेऊ शकतात. ते उपाय नेमके कोणते याविषयीची माहिती सौंदर्यतज्ज्ञांनी appealbridalsaloon या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
यामधला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कच्चं दूध त्वचेला लावून त्याने मसाज करा.. त्वचा चमकदार होईल.
थंडगार दही चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. त्वचेवरचं टॅनिंग जाऊन छान ग्लो येईल.
तिसरा उपाय म्हणजे काकडीचा किस आणि मिल्क पावडर एकत्र करून त्याचा फेसपॅक तयार करा आणि त्याने चेहऱ्याला मसाज करा. त्वचा चमकेल.
ग्रीन टी आणि योगर्ट हे दोन्ही एकत्र करून चेहऱ्याला मसाज केल्यासही त्वचेमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल.
कोरफडीचा ताजा गर आणि केळी हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला लावा. हा लेप चेहऱ्यावर १० मिनिटे ठेवा. टॅनिंग कमी होईल आणि त्वचेला छान थंडावा मिळून ती माॅईश्चराईज होईल.