Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

Published:December 7, 2022 02:29 PM2022-12-07T14:29:21+5:302022-12-07T14:37:43+5:30

Shahnaz Husain Tips For Hair Growth : शॅम्पूने केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणं महत्वाचं आहे. यामुळे तुमचे केस मऊ, गुळगुळीत, चमकदार होतात. तुमचे केस कोरडे असल्यास शॅम्पूनंतर क्रीमी कंडिशनर लावा.

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

हिवाळ्यात केस खूपच गळतात किंवा स्काल्प कोरडा होत असेल तर काही घरगुती उपाय वापरून तुम्ही केसांची वाढ सुंदर बनवू शकता. (Winter Care Tips) थंडीच्या दिवसाच केस कोरडे पडतात आणि स्काल्पचं मॉईश्चर कमी होतं. त्यामुळे कोंडा होतो आणि केस जास्त तुटतात. सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी थंडीत केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. (Shahnaz Husain Tips For Hair Growth)

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

हिवाळ्यात केस कोरडे पडतात त्यामुळे केसांवर कोंडा जमा होतो आणि केसांना फाटे फुटतात. ऑईल थेरेपीचा वापर करून तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून एक किंवा दोनदा शुद्ध खोबरेल तेल कोमट करून केसांना आणि टाळूला लावा. त्यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून डोक्याला गुंडाळा.

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

5 मिनिटे राहू द्या आणि ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा पुन्हा करा. कोंडा झाल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी एका लिंबाचा रस डोक्याला लावा आणि १५ मिनिटांनी केस धुवा. केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरणे टाळा. शॅम्पू केल्यानंतर, दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर एक मग पाण्यात मिसळा आणि वापरा.

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

तुम्ही केसांना कोमट तेल लावत असाल तर डोक्याला आठवड्यातून एकदा मसाज करा. यामुळे केसांना आणि टाळूला खूप फायदा होतो. फार वेगाने मसाज करण्याची गरज नाही. मसाज करण्यासाठी तुमच्या बोटांच्या टोकांचा वापर करा, यामुळे टाळूवरचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात. डोक्याला मसाज केल्यानंतर केसांमध्ये तेल काही वेळ राहू द्या आणि नंतर केस धुवा. तुम्हाला तुमच्या केसांच्या प्रकारानुसार शॅम्पू निवडावा लागेल.

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

शॅम्पूने केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणं महत्वाचं आहे. यामुळे तुमचे केस मऊ, गुळगुळीत, चमकदार होतात. तुमचे केस कोरडे असल्यास शॅम्पूनंतर क्रीमी कंडिशनर लावा. थोड्या प्रमाणात घ्या आणि हलक्या मसाजसह ओल्या केसांना लावा.

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

कंडिशनर केसांवर दोन मिनिटे राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा.

Shahnaz Husain Tips For Hair Growth : थंडीत केस कोरडे झालेत, केसांचं गळणं वाढलंय? दाट केसांसाठी शहनाज हुसैननचे ३ उपाय

हेअर ड्रायर वापरत असल्यास, ते तुमच्या केसांपासून किमान 10 इंच दूर ठेवा. हेअर ड्रायरचा अतिवापर करू नका. यामुळे केस जास्त कोरडे होऊ शकतात.