निरोगी केसांचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच! 'हे' पदार्थ खा, केसांसाठी कधीच ट्रिटमेंट घ्यावी लागणार नाही
Updated:October 22, 2025 10:35 IST2025-10-22T10:30:04+5:302025-10-22T10:35:02+5:30

केसांच्या जवळपास सगळ्याच समस्या कमी करायच्या असतील तर आपल्या स्वयंपाक घरातलेच काही पदार्थ आपण नियमितपणे खायला हवेत आणि काही पदार्थ आवर्जून केसांनाही लावायला हवेत.
ते पदार्थ कोणते याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी dt.anushijain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
केसांची चांगली वाढ होण्यासाठी रताळी उपयुक्त ठरतात. त्यामुळे उपवासालाच नाही तर अन्य दिवशीही रताळी खायला विसरू नका.
केस मुळापासून मजबूत करण्यासाठी आणि केसांचं गळणं कमी करण्यासाठी आवळा खाणे फायदेशीर आहे.
जर तुमच्या केसांची चमक हरवली असेल तर केसांवर जवसाचं जेल लावा. तसेच जवस रोज खा.
दाट आणि लांब केस हवे असतील तर अव्हाकॅडो खायला विसरू नका.
केस खूप जास्त गळायला लागले असतील तर केसांचं गळणं कमी करण्यासाठी भरपूर लोह असणारं पालक नियमितपणे खा.
जर डोक्याची त्वचा कोरडी पडून डोक्यात खूप कोंडा झाला असेल, शिवाय केसही कोरडे झाले असतील तर तुमच्या आहारातलं नारळाचं प्रमाण वाढवा.
केसांमध्ये कोंडा होऊ नये म्हणून दही नियमितपणे खायला पाहिजे. १५ दिवसांतून एकदा केसांच्या मुळाशी दही लावल्यानेही खूप फायदा होतो.
केसांचं मॉईश्चर टिकून राहण्यासाठी तुमचा आहारात रोज काकडी असायला हवी.