तांदळाच्या पिठाची कमाल- ६० सेकंदात उजळेल काळवंडलेला चेहरा- करुन पाहा सोपा उपाय
Updated:February 18, 2026 12:57 IST2026-02-18T12:51:52+5:302026-02-18T12:57:09+5:30

टॅनिंग झाल्यामुळे चेहरा खूप काळवंडला असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा.(rice floor for instant glowing skin)
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे त्यनिमित्ताने सारखे कोणते ना कोणते कार्यक्रम असतात. अशावेळी चेहरा फ्रेश हवा असेल तर हा उपाय लगेचच करून पाहा.(how to get glowing skin using rice floor?)
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ घ्या. तांदळाचं पीठ त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन काढून टाकते आणि त्वचेला छान फ्रेश, चमकदार लूक देते.
आता या पिठामध्ये १ चमचा मध घाला. मध त्वचेला छान हायड्रेट करतो आणि त्वचा मऊ, मुलायम राहण्यास मदत करतो.
यानंतर या पिठामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामधलं लॅक्टीक ॲसिडी त्वचेचा पोत सुधारण्यास आणि तिच्यावर नॅचरल चमक आणण्यास मदत करते.
आता या तिन्ही पदार्थांचा लेप चेहऱ्याला लावा आणि एखाद्या मिनिटांत हलक्या हाताने मालिश करून चेहरा धुवून टाका.
त्वचेवर छान ग्लो आलेला जाणवेल. त्वचेसाठी खूप काही करायला वेळ नसल्यास इंस्टंट ग्लोईंग स्किन देणारा हा उपाय नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.