पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

Updated:June 15, 2025 16:22 IST2025-06-15T16:20:08+5:302025-06-15T16:22:51+5:30

Remove acne scars at home: Pimple marks solution Marathi : काही घरगुती प्रभावी उपाय केले तर चेहऱ्यावरील सुरकुत्या-मुरुमे कमी होतील.

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

त्वचेवर मुरुमे-डाग येणे ही समस्या सामान्य असली तरी यामुळे त्वचा खराब दिसू लागतो. त्वचेची व्यवस्थित काळजी घेतल्यास मुरुमे लवकर बरे होतील. (Remove acne scars at home)

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

मुरुमे आणि डाग नाहीसे करण्यासाठी आपण अनेक ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो. परंतु, तरी देखील त्वचेवरील डाग कमी होत नाही. काही घरगुती प्रभावी उपाय केले तर चेहऱ्यावरील सुरकुत्या-मुरुमे कमी होतील. (Pimple marks solution Marathi)

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

कोरफड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेवरील डाग आणि मुरुमे कमी करण्यास मदत करतात.

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

नारळाचे तेल केवळ त्वचेला पोषण देत नाही तर चेहऱ्यावरील डाग हलके करण्यास मदत करते. डाग कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

मध आपल्या त्वचेसाठी चांगले असते. यामुळे त्वचेवर मुरुमे येण्यापासून थांबवले जाते. चमचाभर मध त्वचेवर १५ मिनिटे राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा, असे आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा.

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

टी ट्री ऑइल हे आपल्या त्वचेसाठी प्रभावी ठरु शकते. यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेवरील मुरुमे आणि डागांच्या खुणा कमी करतात. हे वापरण्यापूर्वी तेलात मिसळून मुरुमांवर लावा.

पिंपल्स-फोडांचे डाग जात नाहीत? रोज रात्री करा खास उपाय, चेहऱ्यावरील सुरकुत्या- मुरुमे होतील कमी

त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते.