1 / 7केसांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहावे यासाठी आपण त्यांची (Natural Things You Can Use As Conditioner) विशेष काळजी घेतो. केस धुतल्यानंतर आपण केसांना कंडिशनिंग करण्यासाठी कंडिशनर लावतो. परंतु या विकतच्या कंडिशनरमध्ये भरपूर प्रमाणात हानिकारक केमिकल्सयुक्त पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असतो. 2 / 7आपण जर सतत केसांसाठी असे केमिकल्सयुक्त, हानिकारक (Natural hair conditioners at home) पदार्थ असलेलया कंडिशनरचा वापर केला तर केसांचे नुकसानच होते. यासाठीच, विकतचे महागडे कंडिशनर आणण्यापेक्षा आपण स्वयंपाक घरातील काही नेहमीच्याच पदार्थांचा वापर कंडिशनर म्हणून करू शकतो, ते पदार्थ कोणते ते पाहूयात...3 / 7दही आपल्या घरात कायम असतेच. केसांसाठी दही हे उत्तम कंडिशनर मानले जाते. यासाठी, सर्वप्रथम फ्रीजमधून दही काढा आणि बाजूला ठेवा, कारण थंड दह्यामुळे सर्दी होऊ शकते. आता ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत दही लावा. आता १५ मिनिटे असेच राहू द्या.यानंतर तुमचे केस धुवा. दही वापरल्यानंतर, तुमच्या केसांना थोडासा शाम्पू लावून केस धुवा, जेणेकरून दह्याचा तुमच्या केसांवर जास्तीत जास्त परिणाम होईल आणि तुमचे केस रेशमी होतील. 4 / 7केळी आणि मध हे केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे. यासाठी, सर्वप्रथम केळी पूर्णपणे मॅश करा. केळी पूर्णपणे कुस्करली की त्यात मध मिसळा. आता केळी आणि मधाचे एकत्रित मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. केळी आणि मधाची पेस्ट केसांना लावल्यानंतर, अर्धा तास तसेच राहू द्या. अर्ध्या तासाने केस धुवा. 5 / 7कोरफडीच्या पानांतील ताजा गर काढून घेऊन त्यात मध मिसळा. मध आणि एलोवेरा जेल यांचे एकत्रित मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. ३० मिनिटांनी केस धुवा. यामुळे तुमच्या केसांना पोषण तर मिळेलच पण केस चमकदारही होतील. 6 / 7ब्लॅक टीमध्ये टॅनिन नावाचा महत्वच घटक असतो, यामुळे केसगळती कमी प्रमाणांत होते केसांना नैसर्गिक रंग देखील येतो. इतकेच नाही तर ब्लॅक टी केसांसाठी एक उत्तम कंडिशनर मानले जाते. चहापावडरमध्ये पाणी घालून मिश्रण थोडे उकळवून घ्यावे, मग गाळून उरलेली ब्लॅक टी हलकेच थंड करून घ्यावी. शाम्पू केल्यानंतर केसांवर हा ब्लॅक टी थेट ओतून याचा कंडिशनर म्हणून वापर करावा. 7 / 7दही आणि बेसन एकत्रित केसांना डीप कंडिशनिंग करून केसांचे सौंदर्य खुलवतात. दही आणि बेसन मिक्स करा. त्यानंतर केसांना हे मिश्रण लावून ३० मिनिटं ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. केस गुळगुळीत, रेशमी आणि छान कंडिशनिंग करून केसांच्या वाढीस चालना देखील मिळते.