माधुरी दीक्षित कमावते करोडो रुपये पण केसांसाठी मात्र निवडते ‘हा’ ५ रुपयांचा घरगुती हेअरमास्क, पाहा त्याची कमाल
Updated:October 31, 2025 18:31 IST2025-10-31T15:23:11+5:302025-10-31T18:31:22+5:30

तुमचेही केस खूप राठ, कोरडे आणि डल झाले असतील तर अभिनेत्री माधुरी दीक्षित सांगतेय तो एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..
आज केसांसाठी कित्येक वेगवेगळे प्रकारचे शाम्पू, तेल, कॉस्मेटिक्स बाजारात आले आहेत. पण तरीही कधीकधी आपली आजी, आई करायची ते पारंपरिक उपाय आठवतात आणि आपणही बऱ्याचदा केसांसाठी किंवा त्वचेसाठी ते करून पाहातो..
माधुरी दीक्षितसारख्या कित्येक अभिनेत्रीही त्याला अपवाद नाहीत. माधुरीकडे आज कित्येक महागडे कॉस्मेटिक्स असले तरी केसांची चमक, मऊपणा कायम ठेवण्यासाठी ती एक जुनाच पारंपरिक उपाय करते. तो कोणता याविषयीची माहिती तिनेच साेशल मीडियावर शेअर केली आहे.
माधुरी सांगतेय तो उपाय अगदी सोपा असून त्यासाठी मोजकेच साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी तर एका भांड्यात एक मोठे पिकलेले केळ कुस्कूरन घ्या.
त्या केळामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामध्ये असणारे काही गुणधर्म केसांना चमक देतात. तसेच डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठीही दही उपयुक्त ठरते.
आता त्यामध्येच १ चमचा मध घाला. मधदेखील केसांना हायड्रेटेड करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याचा लेप केसांना लावा.
साधारण अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुवून टाका. महिन्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. केस खूप मऊ, मुलायम होतील. तसेच त्यांच्यावर छान चमक येईल.

