पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

Updated:October 18, 2025 14:26 IST2025-10-17T17:03:02+5:302025-10-18T14:26:51+5:30

Madhuri Dixit glowing skin secrets : Madhuri Dixit skincare routine : Madhuri Dixit beauty secrets : Madhuri Dixit glowing skin tips : Madhuri Dixit natural beauty remedies :Bollywood actress skincare : ऐन पन्नशीतही माधुरी न चुकता फॉलो करते तिचे खास स्किन केअर रुटीन म्हणून तिची त्वचा आहे नितळ, सुंदर...

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

बॉलीवूडची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित आजही तितकीच सुंदर (Madhuri Dixit glowing skin secrets) आणि तेजस्वी दिसते. जितकी ती तिच्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत दिसत होती. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तिच्या त्वचेवरचा नॅचरल ग्लो, फ्रेशनेस पाहून प्रत्येकजण थक्क होतो.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

काही दिवसांपूर्वी माधुरीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने (Madhuri Dixit beauty secrets) तिच्या चमकदार त्वचेचे सिक्रेट शेअर केले आहे. तिच्या मते, निरोगी त्वचेसाठी फक्त महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्सच नाही, तर एक हेल्दी लाईफस्टाईल, योग्य आहार आणि थोडेफार सेल्फ केअर रुटीन अतिशय गरजेचे असते.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

माधुरी सांगते की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते हायड्रेटेड राहणे. माधुरी दररोज किमान आठ ग्लास पाणी ना चुकता पिते, ज्यामुळे तिची त्वचा नैसर्गिकरित्या तजेलदार आणि फ्रेश राहते. यासोबतच ती तिच्या डाएटची देखील तितकीच काळजी घेते. आहारात ताजी फळे, भाज्या, सॅलॅड आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करते. त्वचेवर पिंपल्स किंवा निस्तेजपणा येऊ नये म्हणून माधुरी तेलकट आणि गोड पदार्थ खाणेच टाळते.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

माधुरीचे सांगते की, त्वचा सुंदर व तजेलदार दिसण्याच्या खास प्रक्रियेची सुरुवात आतून होते. ती दररोज ६ ते ७ तासांची शांत व पुरेशी झोप घेते, जेणेकरून त्वचा स्वतःला दुरुस्त करू शकेल. याव्यतिरिक्त, ती ध्यान आणि योगाच्या माध्यमातून स्ट्रेसवर नियंत्रण ठेवते. तिच्यामते, नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

माधुरी रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ करुन मगच झोपते, जेणेकरून त्वचेवरून मेकअप आणि धूळ पूर्णपणे निघून जाईल. यानंतर, ती अल्कोहोल-फ्री टोनर, व्हिटॅमिन 'सी' सीरम आणि मॉइश्चरायझर न चुकता लावते. माधुरी सांगते की, फक्त त्वचेचीच नाही, तर मान आणि हातांची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे, जेणेकरून संपूर्ण लूक आणि त्वचा एकसारखी आणि चमकदार दिसेल.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

माधुरी सांगते की, तिच्या स्किनकेअर रूटीनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे व्हिटॅमिन 'सी' सीरम आहे. हे अँटिऑक्सिडंट त्वचेचे अनेक समस्यांपासून संरक्षण करते आणि पिगमेंटेशन किंवा काळे डाग हलके करते. व्हिटॅमिन 'सी' सीरम आणि सनस्क्रीन लावल्याने दिवसाची सुरुवात केल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज येते.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

माधुरी आठवड्यातून एकदा तरी वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती फेसमास्क नक्की लावतोच. तिच्या आवडत्या घरगुती मास्कमध्ये मध आणि गुलाबपाणी यांसारखे नैसर्गिक पदार्थ असतात, जे त्वचेला चमकदारपणा आणण्यासाठी मदत करतात. जास्तीच्या मॉइश्चरसाठी माधुरी फेसमास्कमध्ये दूध, कोरफड, मध आणि इसेंन्शियल ऑईलचे काही थेंब मिसळून मास्क तयार करते. सोबतच इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी, माधुरी थंड दुधात भिजवलेल्या काकडीच्या चकत्या चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवतात.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर...

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पाण्याने चेहरा स्वच्छ धुण्याचा सल्ला ती देते. चेहरा धुतल्यानंतर टोनर आणि हलके मॉइश्चरायझर देखील लावते. माधुरीच्या मते, त्वचेला सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक असते. हे त्वचेला हानिकारक अतिनील (UV) किरणांपासून वाचवते आणि सुरकुत्या येण्यापासून प्रतिबंध करते. इतकंच नाही तर दररोज सनस्क्रीन लावल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण आणि तेजस्वी रहाण्यास मदत मिळते.